Join us

लेकीसोबत रामचरण पहिल्यांदाच आला कॅमेऱ्यासमोर, 'मेगा प्रिन्सेस'ला पाहण्यासाठी चाहत्यांची गर्दी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2023 16:46 IST

रामचरणची साऊथमध्ये किती क्रेझ आहे हे दिसून येत आहे.

साऊथ अभिनेता रामचरण (Ramcharan) आणि पत्नी उपासना (Upasana) नुकतेच आईबाबा झाले आहेत. 20 जून रोजी उपासनाने मुलीला जन्म दिला. त्यामुळे सध्या रामचरणचे कुटुंब आनंदात आहेत. आजच उपासना आणि त्यांच्या गोंडस बाळाला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला. यावेळी रुग्णालयाबाहेर चाहत्यांची गर्दी जमली होती. 'मेगा प्रिन्सेस'च्या स्वागतासाठी रामचरणच्या घरी जय्यत तयारी करण्यात आली आहे.

घरी लक्ष्मी येणार म्हणल्यावर आजोबा आणि मेगास्टार चिरंजीवी यांचा आनंद गगनात मावेनासा झालाय. तर दुसरीकडे 'पुष्पा' फेम अल्लु अर्जुनने दोघांचं अभिनंदन केलंय. तसंत तो आपल्या भाचीला भेटण्यासाठी रुग्णालयातही पोहोचला होता. बाळाच्या जन्मानंतर तीन दिवसांनी उपासनाला रुग्णालयातून सोडण्यात आले. लोकांनी त्यांचं फुलांनी स्वागत केलं.  

रामचरणची साऊथमध्ये किती क्रेझ आहे हे दिसून येत आहे. त्यांला मुलगी झाल्याची बातमी कळताच हैदराबादच्या अपोलो रुग्णालयाबाहेर गुलाबी वातावरण करण्यात आलं. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. तसंच रामचरण आणि उपासना बाळासोबत पहिल्यांदाच लोकांसमोर आले. त्यावेळी चाहत्यांनी त्यांचं जंगी स्वागत केलं.

व्हिडिओत रामचरणने लेकीला घेतलं आहे. तसंच तो सर्वांना हात करत आभार मानताना दिसतोय. लेकीच्या जन्माचा आनंद त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसून येतोय. लग्नानंतर ११ वर्षांनी रामचरण आणि उपासनाच्या घरी पाळणा हलला आहे.

टॅग्स :राम चरण तेजापरिवारव्हायरल फोटोज्