Join us

हटके अंदाजात अक्षय कुमार रसिकांच्या येणार भेटीला, ‘रक्षाबंधन’ चित्रपटाचे शूटिंग केले सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2021 16:02 IST

रक्षाबंधन या बहुप्रतिक्षित चित्रपटाचे शूटिंग आजपासून मुंबईत सुरू झाले आहे. अक्षय कुमार सोबत भूमी पेडणेकर या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. सहेजमिन कौर, दिपिका खन्ना, सादिया खतीब आणि स्मृती श्रीकांत या अक्षयच्या बहिणींच्या भूमिकेत दिसणार आहेत.

'खिलाडियो को खिलाडी' म्हणजे अक्की अर्थात अक्षय कुमार.. काम कोणतंही असो खिलाडी अक्की त्यात अव्वल... अभिनय असो किंवा इतर कोणतंही काम त्यात अक्की कोणतीही कसर सोडत नाही. प्रत्येक कामात एव्हरेडी असणारा सळसळता उत्साह, जोष, जल्लोष आणि मेहनत हेच खिलाडी अक्षयच्या यशाचे खरं कारण आहे. त्यामुळेच आता भारतीय चित्रपटसृष्टीतील सगळ्यात महागडा अभिनेत्याच्या यादीत अक्षय कुमारचे नाव गणले जाते. लवकरच रसिकांचे भरघोस मनोरंजन करण्यासाठी अक्षय कुमारा सज्ज झाला आहे. सोशल मीडियावर त्याने त्याच्या नवीन सिनेमाची घोषणा केली आहे. 

रक्षाबंधन या बहुप्रतिक्षित चित्रपटाचे शूटिंग आजपासून मुंबईत सुरू झाले आहे. अक्षय कुमार सोबत भूमी पेडणेकर या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. सहेजमिन कौर, दिपिका खन्ना, सादिया खतीब आणि स्मृती श्रीकांत या अक्षयच्या बहिणींच्या भूमिकेत दिसणार आहेत.अलका हिरानंदानी आणि आनंद एल राय यांच्या सहकार्याने ह्या चित्रपटाचे सादरीकरण आणि वितरण झी स्टुडिओज द्वारा करण्यात येणार आहे.हिमांशु शर्मा आणि कनिका ढिल्लन लिखित , आनंद एल राय द्वारा दिग्दर्शित, रक्षाबंधन ही फिल्म केप ऑफ गुड फिल्म्स असोसिएशन सह कलर यलो प्रॉडक्शन ची फिल्म आहे.

 आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरून ही माहिती देताना अक्षय कुमार म्हणाला कि, "जेव्हा मी आणि माझी बहीण अलका मोठे होत होतो तेव्हा ती माझी पहिली फ्रेंड होती. आणि ती आमची अगदी नैसर्गिक मैत्री होती.आनंद एल राय यांचा "रक्षाबंधन" हा चित्रपट तिला समर्पित आहे आणि आमच्या त्या विशेष नात्याचा उत्सव आहे.आज शूटिंगच्या पहिल्या दिवशी आपल्या प्रेमाची आणि शुभेच्छांची गरज आहे "

टॅग्स :अक्षय कुमारभूमी पेडणेकर