Join us

Rakhi Sawant : “तो मला सोडून तिच्याकडे गेला...,” २१ दिवसांतच विस्कटला राखी सावंतचा संसार...!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2023 18:23 IST

Rakhi Sawant : गेल्या काही दिवसांपासून राखी सावंत सतत चर्चेत आहे. पुन्हा एकदा राखीचं लग्न धोक्यात आहे....

गेल्या काही दिवसांपासून राखी सावंत (Rakhi Sawant) सतत चर्चेत आहे.  राखी बिग बॉस मराठी ४ मधून बाहेर पडली आणि अचानक तिच्या लग्नाचे फोटो व्हायरल झालेत. राखी व तिचा बॉयफ्रेन्ड आदिल खान दुर्रानी (Adil Khan Durrani ) यांनी निकाह केल्याचं समोर येताच सगळ्यांना आश्चर्याचा धक्का बसला.  मी व आदिलने सात महिन्यांपूर्वीच निकाह केल्याचं राखीने स्पष्ट केलं. या लग्नासाठी राखीने धर्मांतर करत आपलं नावही बदललं. पण मग अचानक या लग्नात ट्विस्ट आला.

होय, आदिलने राखीबरोबरच्या लग्नाला दुजोरा देण्यास टाळाटाळ करायला सुरूवात केली. आदिल असं का करतोय, हे कळायला मार्ग नव्हता अन् तिकडे राखी मीडियासमोर रडत सुटली. अगदी माझ्यासोबतच असं का घडतं? माझ्याच आयुष्यात इतकी दु:ख का? असं म्हणत राखी मीडियासमोर ढसाढसा रडली. अखेर आदिलही मानला. त्याने लग्न केल्याचं स्वीकारलं. पण आता पुन्हा एकदा राखीचं लग्न धोक्यात आहे. आदिलचे तनु नावाच्या मुलीशी अफेअर असून तो तिच्यासोबत राहत असल्याचा दावा राखीने आता केला आहे. नुकतंच राखीच्या आईचं निधन झालं. आईच्या निधनानंतर राखीच्या संसारात नवं वादळ आलं आहे.  

आदिलचं अफेअर...सोमवारी पुन्हा एकदा राखी मीडियासमोर रडताना दिसली. आदिलचं अफेअर आणि त्याच्या गर्लफ्रेंडबद्दल तिने खुलासा केला आदिल आपल्याला सोडून गर्लफ्रेंडबरोबर राहत असल्याचा दावाही तिने केला. आदिलच्या गर्लफ्रेंडचं नाव तनू आहे. तनू मला तुझी लाज वाटते. आदिल आता त्या मुलीबरोबर राहत आहे. मी परत यावं असं वाटत असेल तर माफी माग, मी सर्व सोडून येऊन जाईन , असं आदिल म्हणाला होता. मी माफी मागितली, पण तो परत आला नाही. दुसऱ्याच्या पतीला चोरून त्याच्याबरोबर राहणाऱ्या त्या मुलीला लाज वाटायला पाहिजे. माझाच पती खोटारडा आहे, त्यामुळे मी काहीच करू शकत नाही, असं राखी म्हणाली. आदिलने बॉलिवूडमध्ये येण्यासाठी माझा वापर केला. माझे पैसे घेतले. माझ्याकडे सर्व पुरावे आहेत. त्याने माझा शारिरीक, मानिसक वापर केला. लग्नानंतर मला कळलं की त्याच्यावर अनेक क्रिमिनल केसेस आहेत, असंही ती म्हणाली.   

टॅग्स :राखी सावंतबॉलिवूड