Join us
Daily Top 2Weekly Top 5

Rakhi Sawant : राखी सावंतचं इन्स्टाग्राम अकाउंट हॅक; आदिल खान आणि राजश्रीला धरलं जबाबदार, म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2023 13:58 IST

Rakhi Sawant And Adil Khan : दहा लाखांहून अधिक फॉलोअर्स असलेलं राखी सावंतचं इन्स्टाग्राम अकाउंट हॅक झालं आहे.

ड्रामा क्वीन राखी सावंत सतत नवनवीन कारणांमुळे चर्चेत असते. पण आता राखी एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. दहा लाखांहून अधिक फॉलोअर्स असलेलं राखी सावंतचं इन्स्टाग्राम अकाउंट हॅक झालं आहे. "मला एक्सेस नाही. आदिल खान आणि राजश्रीने माझं इन्स्टाग्राम अकाउंट हॅक केलं आहे, ते मला जेवू देत नाहीत आणि झोपू देत नाहीत. मी घरी जाते तेव्हा ते माझा छळ करतात" असं अभिनेत्रीने म्हटलं आहे. 

राजश्रीने राखी सावंतने धमकावल्याचा आरोप करत पोलिसांत तक्रार दाखल केली आहे, तर आदिल बलात्कार प्रकरणात अटक झाल्यानंतर जामिनावर आता बाहेर आला आहे. इराणमधून म्हैसूरमध्ये शिकण्यासाठी आलेल्या विद्यार्थिनीवर बलात्कार, फसवणूक, धमकी आणि ब्लॅकमेल केल्याचा आरोप आदिलवर होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आदिलने लग्नाच्या बहाण्याने तिच्यावर बलात्कार केला, त्यानंतर तिने तक्रार दाखल केली. ब्लॅकमेल केल्याचा आरोपही आहे.

राखी सावंत आणि आदिल खान दुर्रानी पुन्हा एकदा त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आले आहेत. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर आदिलने राखी सावंतबाबत अनेक मोठे धक्कादायक खुलासे केले आहेत. आदिलने तिला इस्लाम स्वीकारण्यास भाग पाडलं आणि अनेक वेळा मारहाणही केल्याचं म्हटलं आहे. राखी सावंतनेही दुसरीकडे पत्रकार परिषद घेतली. आदिलच्या प्रत्येक आरोपाला जोरदार उत्तर दिलं आहे. 

प्रत्येक आरोपाला उत्तर देताना राखीने सांगितले की, ती जन्माने हिंदू आहे, पण तिच्या आईमुळे तिने ख्रिश्चन धर्म स्वीकारला आहे. आदिलने तिला इस्लाम स्वीकारण्यास भाग पाडलं आणि अनेक वेळा मारहाणही केल्याचं म्हटलं आहे. राखीने सांगितले की शैलीच्या माध्यमातून तिची आदिल दुर्रानीशी भेट झाली. त्याला राखीसोबत व्यवसाय करायचा होता. राखीने सांगितले की शैलीच्या माध्यमातून तिची आदिल दुर्रानीशी भेट झाली. त्याला राखीसोबत व्यवसाय करायचा होता. 

राखीने सांगितले की, आदिलने म्हैसूरमध्ये तिच्यावर जबरदस्ती केली. त्यानंतर त्याने माझ्याशी लग्न करण्याचे वचन दिले. आमचं लग्न गोव्यात झाले होते. लग्नाच्या 8 महिन्यात तो मला खूप मारायचा. मारहाणीमुळे खूप ब्लीडिंग झालं होतं. राखी सावंतने बिग बॉस मराठीतून बाहेर पडल्यानंतर ती गरोदर असल्याचा खुलासा केला होता, पण आदिलला सत्य समजल्यानंतर तिचं मिसकॅरेज झालं होतं. राखीने याआधी आदिलसोबतचे अनेक फोटो शेअर केले आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

टॅग्स :राखी सावंतबॉलिवूड