आदित्य धर यांचा ब्लॉकबस्टर 'धुरंधर: द रिव्हेंज' हा सिनेमा रिलीज झाल्यापासून तुफान गाजतोय. या सिनेमातील प्रत्येक भूमिकेचं, त्यातील कलाकारांचं सोशल मीडियावर कौतुक होतंय. यामध्येच एका भूमिकेला तर प्रेक्षकांचं भरभरुन प्रेम मिळतंय ही भूमिका म्हणजे जमील जमाली. अभिनेता राकेश बेदी यांनी साकारलेली भूमिका पडद्यावर तुफान गाजली. मात्र, या भूमिकेसाठी राकेश बेदी पहिली पसंती नव्हते. ही भूमिका त्यांच्यापूर्वी दुसऱ्या अभिनेत्याला ऑफर करण्यात आली होती.
कास्टिंग डायरेक्टर मुकेश छाब्रा यांनी नुकतीच 'बॉलिवूड हंगामा'ला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्यांनी जमील जमाली यांच्या भूमिकेविषयी भाष्य केलं. ''जमील जमाली या भूमिकेसाठी राकेश बेदी पहिली पसंती नव्हते. त्यांच्यापूर्वी इंडस्ट्रीतल्या अन्य २-३ कलाकारांना ही भूमिका ऑफर झाली होती. मात्र, त्यांनी या भूमिकेसाठी नकार दिला. त्यानंतर राकेश बेदी यांनी विचारणा करण्यात आली. विशेष म्हणजे त्यांनी कोणतेही जास्त प्रश्न न विचारता लगेच या सिनेमासाठी होकार दिला. त्यांनी सिनेमाची कथाही ऐकली नव्हती. फक्त आमच्यावर विश्वास ठेवला आणि प्रोजेक्टसाठी होकार दिला'', असं मुकेश छाब्रा म्हणाले.
पुढे ते म्हणतात, ''राकेश बेदी यांनी या भूमिकेला पुरेपूर न्याय दिला. या भूमिकेनंतर त्यांना प्रेक्षकांकडून जे प्रेम मिळतंय ते त्यांच्यासाठी खरंच खूप खास आहे. लोकांचं प्रेम मिळाल्यानंतर ते माझ्याकडे आले आणि, '४९ वर्षात पहिल्यांदाच मला इतकं प्रेम मिळतंय'', असं म्हणाले.
दरम्यान, धुरंधर हा सिनेमा डिसेंबर २०२५ रोजी रिलीज झाला होता. या पहिल्या पार्टलाही प्रेक्षकांनी बरंच प्रेम दिलं. त्याच्यानंतर लगेच मार्च २०२६ मध्ये त्याचा सीक्वल आला. हा सीक्वल तर बॉक्स ऑफिसवर आजही धमाकेदार कमाई करत आहे. या सिनेमात रणवीर सिंह, संजय दत्त, सारा अर्जुन, राकेश बेदी, अर्जुन रामपाल आणि अक्षय खन्ना यांसारखे दिग्गज कलाकार झळकले आहेत.
Web Summary : Rakesh Bedi's 'Dhruvandhar' role was initially offered to others. Casting director Mukesh Chhabra revealed Bedi accepted without hesitation, trusting the team. Bedi expressed gratitude for the overwhelming love received after 49 years in the industry. The film stars Ranveer Singh and Sanjay Dutt.
Web Summary : राकेश बेदी का 'ध्रुवंधर' किरदार पहले अन्य लोगों को पेश किया गया था। कास्टिंग डायरेक्टर मुकेश छाबड़ा ने खुलासा किया कि बेदी ने बिना किसी हिचकिचाहट के टीम पर भरोसा करते हुए स्वीकार कर लिया। बेदी ने इंडस्ट्री में 49 साल बाद मिले जबरदस्त प्यार के लिए आभार व्यक्त किया। फिल्म में रणवीर सिंह और संजय दत्त हैं।