Rakesh Bedi Mumbai Traffic Police : रणवीर सिंगच्या 'धुरंधर २' या स्पाय थ्रिलर चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. या चित्रपटातील पाकिस्तानी राजकारणी 'जमील जमाली'ची भूमिका साकारणारे ज्येष्ठ अभिनेते राकेश बेदी सध्या चर्चेत आहेत. चित्रपटातील त्यांच्या कामाचे सर्वत्र कौतुक होतेय. यातच मुंबईतील एका वाहतूक सिग्नलवर राकेश बेदी यांच्यासोबत घडलेली खास घटना सध्या सोशल मीडियावर चर्चेत आली आहे.
'मॅशेबल इंडिया'च्या 'द बॉम्बे जर्नी' या शोसाठी राकेश बेदी एका युट्युबरसोबत गाडीतून फिरत होते. मुंबईच्या एका सिग्नलवर गाडी उभी असताना एका वाहतूक पोलीस अधिकाऱ्याने त्यांना थांबवले. राकेश बेदींनी गाडीची खिडकी खाली करताच त्या अधिकाऱ्याने त्यांच्याशी हस्तांदोलन केले आणि 'धुरंधर २' मधील त्यांच्या कामाची तोंडभरून स्तुती केली.
"साहेब, तुमचा चित्रपट पीव्हीआरमध्ये पाहिला!"
तो पोलीस अधिकारी उत्साहाने म्हणाला, "साहेब, धुरंधर एक उत्तम चित्रपट आहे. मी तो आवर्जून पीव्हीआरमध्ये पाहिला. तुमचे सर्व चित्रपट हिट आहेत, मी तुमचा सलमान खानसोबतचा चित्रपटही पाहिला आहे". पोलिसाच्या या प्रेमाने राकेश बेदीही भारावून गेले. यावेळी हसत-खेळत संवाद साधताना राकेश बेदींनी गंमतीने पोलिसाला म्हटले, "आता माझं चालान फाडू नका बरं का", यावर दोघेही मोठ्याने हसू लागले. राकेश बेदी आणि पोलीस अधिकाऱ्यामधील या मजेशीर संवादावर नेटकरी भरभरून कमेंट्स करत आहेत.
Web Summary : Rakesh Bedi, known for 'Dhamaal 2,' was stopped by Mumbai traffic police. The officer recognized Bedi from the film and praised his work. Bedi jokingly asked the officer to avoid issuing a ticket, leading to laughter.
Web Summary : राकेश बेदी, 'धमाल 2' के लिए जाने जाते हैं, को मुंबई ट्रैफिक पुलिस ने रोका। अधिकारी ने फिल्म से बेदी को पहचाना और उनके काम की सराहना की। बेदी ने मजाक में अधिकारी से टिकट जारी करने से बचने के लिए कहा, जिससे हंसी का माहौल बन गया।