Join us
Daily Top 2Weekly Top 5

जेलमध्ये असताना काय करायचा राजपाल यादव? फराह खानला म्हणाला, "तिथे माझे चाहते..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2026 12:44 IST

फराह खानने राजपालला विचारले प्रश्न

९ कोटींचं कर्ज आणि चेक बाऊन्सप्रकरणी राजपाल यादव काही दिवसांपूर्वी तिहार कारागृहात होता. त्याने स्वत:च सरेंडर केलं होतं. त्याच्या मदतीसाठी इंडस्ट्रीतील काही सेलिब्रिटी पुढे सरसावले होते. दिल्ली हायकोर्टाने काही अटींवर त्याला अंतरिम जामीन मंजूर केला आणि तुरुंगाबाहेर आला. राजपाल आगामी 'भूत बंगला' सिनेमात दिसणार आहे. जेलबाहेर आल्यानंतर त्याने अनेक मुलाखतींमधून आपल्याला पैशांची अडचण नसल्याचं स्पष्ट केलं. तर आता नुकतंच फराह खानच्या युट्यूब चॅनलवर राजपाल पाहुणा म्हणून आला होता. यावेळी त्याने तुरुंगात असतानाची परिस्थिती सांगितली. 

फराह खान तिच्या युट्यूब चॅनलवरील प्रत्येक एपिसोडमध्ये एखाद्या सेलिब्रिटीच्या घरी जाते. ती त्यांचं आलिशान घर दाखवते आणि त्यांची स्पेशल रेसिपीही दाखवते. तिच्यासोबत कुक दिलीपही असतो जो स्वत: आता सेलिब्रिटीच झाला आहे. नुकतेच फराह आणि दिलीप राजपाल यादवच्या घरी पोहोचले. फराहने राजपालला त्याचे जेलमध्येही चाहते होते का? असा प्रश्न विचारला. यावर राजपाल म्हणाला, "चाहते तर नव्हते. पण तिथे एक सिस्टीम, कायदा आणि शिस्त असते. त्याउपर कोणी मोठं नसतं.' अशा परिस्थिती कसा राहिला, राग आला का? यावर तो म्हणाला, 'नाही, मी कोणत्याही परिस्थितीत जगायचं शिकलो आहे.' तुरुंगात असताना कोणती ड्युटी केली का? यावर राजपाल म्हणाला, "नाही, तशी वेळ आली नाही. पण खूप शिस्तीत तिथे राहावं लागलं जे करावंच लागणार होतं आणि तेवढे दिवस फक्त पुढे ढकलायचे होते."

आपल्यावर ओढवलेल्या कठीण प्रसंगी ज्यांनी ज्यांनी मदत केली त्यांचे राजपालने आभार मानले. आता लवकरच तो हिंदी सिनेमांमध्ये पु्न्हा त्याच विनोदी भूमिकेत दिसणार आहे. १ एप्रिल रोजी अक्षय कुमारचा 'भूत बंगला' रिलीज होणार आहे. प्रियदर्शन यांनी सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. याशिवाय 'वेलकम टू द जंगल', 'हैवान'मध्येही त्याची भूमिका आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Rajpal Yadav's jail experience: 'I had fans even there'

Web Summary : Rajpal Yadav, imprisoned for debt issues, shared his jail experience with Farah Khan. He emphasized discipline and acknowledged support received during his difficult time. He's now returning to comedy roles in upcoming films like 'Bhoot Bungla'.
टॅग्स :राजपाल यादवफराह खानबॉलिवूड