Join us
Daily Top 2Weekly Top 5

'जे घडत होतं ते पचवणं...'; राजपाल यादवमुळे कुटुंबाला सहन करावा लागला मनस्ताप?, पत्नीने व्यक्त केल्या भावना

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2026 11:18 IST

Rajpal yadav: चेक बाऊन्स प्रकरणी राजपाल याला तुरुंगात जाव लागलं होतं. ज्याचा परिणाम राजपालसह त्याच्या कुटुंबियांनाही भोगावा लागला.

बॉलिवूड अभिनेता आणि राजपाल यादव आणि त्याच्या कुटुंबियांना गेल्या काही महिन्यांपासून बऱ्याच संकटांचा सामना करावा लागत आहे. चेक बाऊन्स प्रकरणी राजपाल याला तुरुंगात जाव लागलं होतं. ज्याचा परिणाम राजपालसह त्याच्या कुटुंबियांनाही भोगावा लागला. अलिकडेच त्याच्या पत्नीने एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये तिने राजपाल तुरुंगात गेल्यानंतर कुटुंबाला कशाप्रकारे संकटांचा सामना करावा लागला हे सांगितलं.

राजपाल यांची पत्नी राधा हिने 'कर्ली टेल्स'ला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये तिने राजपाल तुरुंगात गेल्यानंतर ओढावलेल्या संकटांविषयी भाष्य केलं. ''जे काही घडत होतं ते पचवणं खूप कठीण जात होतं. ज्यावेळी राजपाल तुरुंगात होते त्यावेळी सोशल मीडियावर त्यांच्याविषयी बरंच काही बोललं जात होतं. त्याचवेळी आमच्या घरात लग्नदेखील होतं. घरात लहान मुले होते. त्यामुळे ही परिस्थिती हाताळण्याचा मी पुरेपूर प्रयत्न करत होते. या प्रसंगातही मी सगळ्यांना जोडून ठेवायचा प्रयत्न करत होते'', असं राधा म्हणाल्या.

पुढे त्या म्हणतात, ''राजपालला तुरुंगातून सोडवून आणण्यासोबतच घरातील वातावरण नॉर्मल ठेवणं या दोन गोष्टी तेव्हा माझ्यासाठी टॉप प्रायोरिटीवर होत्या. राजपालचं तुरुंगातून बाहेर येणं फार गरजेचं होतं. कारण, लग्नाची तारीख सुद्धा जवळ येत होती. माझ्या मोठ्या मुलीला सोशल मीडियाच्या माध्यमातून राजपालविषयी काय घडतंय हे सगळं कळत होतं.  त्यामुळे तेव्हा कसंबसं आम्ही तिला समजावलं. आमची धाकटी मुलगी ७ वर्षाची आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टी तिला कळणं फार कठीण होतं. या परिस्थितीत पॉझिटिव्ह राहणं माझ्यासाठी फार गरजेचं होतं.''

दरम्यान, राजपाल लवकरच भूत बंगला या सिनेमात झळकणार आहे. या सिनेमात अक्षय कुमार मुख्य भूमिकेत आहे. त्याचसोबत तो मल्टीस्टारर वेलकम टू द जंगल या सिनेमातही दिसणार आहे. या व्यतिरिक्त त्याच्याकडे दोन वेबसीरिज आणि २ सिनेमादेखील आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Rajpal Yadav's Jail Time: Family's ordeal and wife's emotional account.

Web Summary : Rajpal Yadav's imprisonment caused immense hardship for his family. His wife reveals the challenges faced, especially managing their children and maintaining normalcy during a family wedding amidst social media scrutiny. She focused on Rajpal's release and a stable home environment.
टॅग्स :राजपाल यादवबॉलिवूडसेलिब्रिटीतुरुंग