Join us
Daily Top 2Weekly Top 5

राजपाल यादव आजही तुरुंगातच! नाही मिळाला जामीन, 'या' दिवशी होणार पुढील सुनावणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2026 16:29 IST

चेक बाउन्स प्रकरणी तुरुंगात असलेल्या राजपाल यादवच्या अडचणी आणखी वाढत आहे

विनोदी अभिनेता राजपाल यादव सध्या तिहार जेलमध्ये आहे. ९ कोटींचं कर्ज फेडू न शकल्याप्रकरणी त्याने स्वत:च तिहार जेलमध्ये आत्मसमर्पण केलं. गेल्या काही वर्षांपासून ही केस सुरु होती. राजपालला अनेकदा समन्सही बजावण्यात आलं होतं. मात्र तो हजर झाला नव्हता. अखेर त्याला तुरुंगात पाठवण्यात आलं आणि सहा महिन्यांची शिक्षा सुनावण्यात आली. आज राजपालच्या जामीन अर्जावर सुनावणी झाली. मुळात कर्ज फेडायला इतका वेळ का लागला म्हणत कोर्टाने त्याला फटकारलं. तर आता राजपालला जामीनही नाकारण्यात आला आहे. आजही राजपाल यादव तिहार तुरुंगातच राहणार आहे.

पुन्हा होणार सुनावणी

चेक बाउन्स प्रकरणी तुरुंगात असलेल्या राजपाल यादवच्या अडचणी आणखी वाढत आहे. आज झालेल्या जामीन अर्जाच्या सुनावणीवेळी कोर्टाने त्याला फटकारलं. दरम्यान राजपालला आज दिल्ली उच्च न्यायालयाकडून कोणताही दिलासा मिळालेला नाही. त्याच्या जामीन अर्जावर कोर्टाने मुरली प्रोजेक्ट कंपनीला नोटीस दिली आहे. याप्रकरणी पुढील सुनावणी १६ फेब्रुवारी रोजी होणार आहे. राजपालच्या घरी फंक्शन होणरा आहे. त्याच्या भाचीचं लग्न आहे. यासाठी त्याला तातडीने जामीन हवा होता. ५ फेब्रुवारीपासून तो तिहार जेलमध्ये आहे. 

नक्की प्रकरण काय?

 २०१० साली आलेल्या 'अता पता लापता' सिनेमासाठी राजपालने मुरली प्रोजेक्ट्स प्रायव्हेट लिमिटेडकडून ५ कोटींचं कर्ज घेतलं होतं. सिनेमा फ्लॉप झाल्याने त्याला कर्ज फेडता आलं नाही. गेल्या १० वर्षांपासून व्याज वाढून ही रक्कम ९ कोटींपर्यंत पोहोचली. अनेक चेक बाउन्स झाल्याने त्याच्यावर ७ वेगवेगळ्या केस सुरु होत्या. 

English
हिंदी सारांश
Web Title : Rajpal Yadav Remains in Jail; Bail Denied, Next Hearing Soon.

Web Summary : Actor Rajpal Yadav remains in Tihar Jail for failing to repay a loan. His bail was denied after the court reprimanded him for the delay. The next hearing is scheduled for February 16th. He borrowed money in 2010 for a film and has been facing legal issues since.
टॅग्स :राजपाल यादवबॉलिवूडदिल्लीन्यायालय