Join us
Daily Top 2Weekly Top 5

सर्वांनी खिल्ली उडवली पण सलमान खानने केला सपोर्ट! राजपाल यादव भावुक, म्हणाला- "भाई तुम्ही..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2026 11:54 IST

राजपाल यादवची एका पुरस्कार सोहळ्यात खिल्ली उडवण्यात आली. परंतु सलमानने मात्र राजपालला चांगलाच सपोर्ट केला. त्यामुळे राजपाल भावुक झाला असून त्याने सलमानचे आभार मानले आहेत

सध्या बॉलिवूड अभिनेता राजपाल यादव चांगलाच चर्चेत आहे. ९ कोटी चेक बाऊन्स प्रकरणात राजपाल यादवला कोर्टाने शिक्षा सुनावली होती. त्यानंतर राजपालने काही रक्कम जमा केल्याने सध्या तो जामीनावर बाहेर आहे. अशातच या प्रकरणाला धरुन राजपाल यादवची एका पुरस्कार सोहळ्यात खिल्ली उडवण्यात आली. परंतु सलमानने मात्र राजपालला चांगलाच सपोर्ट केला. त्यामुळे राजपाल भावुक झाला असून त्याने सलमानचे आभार मानले आहेत.

राजपाल यादवने व्यक्त केली कृतज्ञता सलमान खानने दिलेल्या या पाठिंब्यानंतर राजपाल यादव भावुक झाला आहे. त्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून सलमानचे आभार मानले आहेत. राजपाल म्हणाला, "भाई, माझ्या ३० वर्षांच्या कारकीर्दीचं कौतुक केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तुम्ही कायमच मोठ्या भावासारखे मला मार्ग दाखवत आला आहात. नमन'', अशा शब्दांमध्ये राजपालने सलमान खानचे आभार मानले आहेत. 

सलमान राजपालबद्दल काय म्हणाला?सलमानने म्हटले की, "राजपाल भाई, तुम्ही गेल्या ३० वर्षांपासून या इंडस्ट्रीत काम करत आहात. आम्ही सगळेच तुम्हाला वारंवार सिनेमात कास्ट करतो. तुमच्या कामाचा दर्जा पाहून तुम्हाला यापुढेही काम मिळतच राहील आणि याच डॉलर रेटवर मिळत राहील. हेच सत्य आहे. तुमच्या कामाचा दर्जा आणि तुमची किंमत आम्हाला ठाऊक आहे, म्हणूनच आम्ही तुम्हाला वारंवार कास्ट करतो.''

''तुम्हाला भविष्यातही खूप काम मिळेल आणि ते चांगल्या मानधनावरच मिळेल, हेच वास्तव आहे. कधीकधी उत्साहाच्या भरात लोकांच्या तोंडून काही गोष्टी निघून जातात, पण तुम्ही तुमचे काम मनापासून करत राहा. डॉलर वर होवो किंवा खाली काय फरक पडतो?शेवटी व्यवहार तर भारतातच करायचा आहे."

English
हिंदी सारांश
Web Title : Rajpal Yadav emotional as Salman Khan supports him after mockery.

Web Summary : Rajpal Yadav faced mockery at an event regarding a check bounce case. Salman Khan's support moved Yadav, who expressed gratitude, acknowledging Khan's guidance and praising his 30-year career. Khan assured Yadav of continued work and value in the industry.
टॅग्स :राजपाल यादवसलमान खानबॉलिवूड