Rajpal Yadav: अभिनेता राजपाल यादव सध्या आर्थिक अडचणीत सापडला आहे.अभिनेत्याने ५ फेब्रुवारी रोजी तिहार तुरुंगात सरेंडर केलं आहे. २०१० साली मध्ये राजपाल यादवने दिग्दर्शित केलेला सिनेमा आता पता लापता पुरता आपटला. त्यामुळे त्याला त्याच्या ५ कोटी रुपयांची कर्जबाकी करता आली नाही.ही कर्जाची रक्कम दिवसेंदिवस वाढत गेल्याने तो हे पैसे परत करु शकला नाही त्यामुळे त्याला अभिनेत्यावर आत्मसमर्पण करण्याची वेळ आली.या बातमीची कुरकुर लागताच राजपालच्या मदतीसाठी इंडस्ट्रीतील कलाकार पुढे आले. या आर्थिक संकटातून अभिनेता बाहेर पडावा यासाठी त्याला मदतीचा हात देण्यात आला. मात्र, आता या चर्चांदरम्यान, राजपाल यादवच्या भावाने त्यांच्यामध्ये झालेल्या शेवटच्या संवादाबद्दल सांगितलं.
एकीकडे संपूर्ण यादव कुटूंब विचारांच्या गर्तेत सापडले असतानाच सोशल मीडियावर राजपाल यादवबाबत भलतीच चर्चा आहे. सरेंडर करण्यापूर्वी राजपाल यादवने मदत मागितली, तो रडत होता. आता या चर्चावर अभिनेत्याने भावाने प्रतिक्रिया देत त्यांचं खंडण केलं आहे. 'NDTV' सोबत राजपाल यादवच्या भावाने स्पष्ट केलं की, तुरुंगात जाताना त्यांचा भाऊ रडला नाही किंवा विनवणी केली नाही. सोशल मीडियावरील हे वृत्त केवळ अफवा आहेत.ते म्हणाले,"आम्ही एकत्र लहानाचे मोठे झालो आहोत.मला माहिती आहे, कितीही मोठं संकट असेल तरी तो कोणासमोर रडू शकत नाही किंवा हात पसरणार नाही.हे सगळं घडल्यानंतर त्याने मला फोन केला आणि म्हणालेला, तुम्ही काहीही काळजी करू नका. त्याने आम्हाला आश्वासन दिलं की पैसे उधार घेतलेले नव्हते, तर गुंतवणूकीच्या स्वरुपात घेतले आहेत."
यानंत मग ते मुलाखतीत म्हणाले,"त्याने काही कागदपत्रांवर स्वाक्षरी केली, जी आम्हाला सांगण्यात आली की ती गुंतवणूकीची कागदपत्रे आहेत. नंतर, जेव्हा चित्रपट चांगला चालला नाही त्या तेव्हा त्या कागदपत्रांचा वापर करून पैशाची मागणी सुरू झाली.सोशल मीडियावर आणि माध्यमांमध्ये अशा अफवा आहेत की त्याला अश्रू अनावर झाले होते, त्याने मदत मागितली, तर तो असे काही बोलला असेल यावर आम्हाला विश्वासच बसत नाही." असं म्हणत श्रीपाल यादव यांनी त्या अफवांचं खंडण केलं.
राजपाल यादव काय म्हणालेला?
सरेंडर कऱण्यापू्र्वी राजपाल यादव प्रचंड भावुक झाला होता. मी कायद्याचा आदर करणारा नागरिक आहे. मी पळून जाणार नाही. परंतू, सध्या माझ्याकडं खरंच पैसे नाहीत. जर माझ्याकडे पैसे असते तर मी नक्कीच दिले असते. मी कोणाची फसवणूक करण्यासाठी हे केलं नाही."असं त्याने सांगितलं.