Join us
Daily Top 2Weekly Top 5

राजकुमार रावने रिक्रिएट केली मिथून चक्रवर्तींची आयकॉनिक स्टेप, पाहा हा फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2019 20:07 IST

अभिनेता राजकुमार राव सध्या अनुराग बसू यांच्या 'लाईफ इन ए मेट्रो' चित्रपटाच्या सीक्वलमध्ये काम करीत आहे.

ठळक मुद्देराजकुमार राव व फातिमा सना शेख सोबत दिसणार 'लाईफ इन ए मेट्रो' चित्रपटाच्या सीक्वलमध्ये

अभिनेता राजकुमार राव सध्या अनुराग बसू यांच्या 'लाईफ इन ए मेट्रो' चित्रपटाच्या सीक्वलमध्ये काम करीत आहे. या चित्रपटाच्या सेटवरील एक फोटो त्याने पोस्ट केला आहे. यात त्याच्यासोबत 'दंगल' फेम अभिनेत्री फातिमा सना शेख मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

राजकुमारने चित्रपटाच्या सेटवरील फोटो शेअर करून लिहिले की, "लवकरच तुमच्यासमोर येत आहे. तोपर्यंत एक झलक.

 

या फोटोमध्ये राजकुमार राव हा मिथून चक्रवर्ती यांच्या 'डिस्को डान्सर' चित्रपटातील आयकॉनिक स्टेप करताना दिसत आहे. फातिमा आणि राजकुमार ८० च्या दशकातील वेशभूषेत दिसत आहेत. सीक्वलमध्ये तो मिथूनचा चाहता असावा असे फोटो पाहून वाटत असल्याचे बोलले जात आहे. राजकुमार राव आणि फातिमा सना शेख पहिल्यांदाच एकत्र काम करीत आहेत. या दोघांशिवाय 'लाईफ इन ए मेट्रो'च्या सीक्वलमध्ये अभिषेक बच्चनही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. या तिघांशिवाय या सिनेमात कोण कोण कलाकार पाहायला मिळणार हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.

अनुराग बासू यांचा ‘लाईफ इन ए मेट्रो’ २००७ मध्ये रिलीज झाला होता. या चित्रपटात शिल्पा शेट्टी, शाईनी आहुजा, केके मेनन, धर्मेन्द्र, नफीसा अली़ कंगना राणौत, इरफान खान, शर्मन जोशी, कोंकणा सेन शर्मा अशी तगडी स्टारकास्ट होती. या चित्रपटात चार जोडप्यांची कथा दिसली होती. समीक्षक आणि प्रेक्षक दोन्हींनी या चित्रपटाला मनापासून दाद दिली होती. चित्रपटाने अनेक अवार्डसही जिंकले होते.

टॅग्स :फातिमा सना शेखराजकुमार रावअभिषेक बच्चन