Join us
Daily Top 2Weekly Top 5

Video: लोकांना नवा 'दृष्टी'कोन द्यायला येतोय 'श्रीकांत', राजकुमार रावसोबत झळकणार हा मराठमोळा अभिनेता

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2024 13:46 IST

राजकुमार रावच्या आगामी 'श्रीकांत' सिनेमाचा पहिला व्हिडीओ समोर आलाय. या सिनेमात राजकुमारसोबत मराठमोळा अभिनेताही झळकणार आहे

राजकुमार राव हा बॉलिवुडमधील लोकप्रिय अभिनेता. नेहमीचे सिनेमे न करता सतत नवनवीन भूमिकांमधून राजकुमार रावने प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. 'शाहिद', 'स्पॉटलाईट', 'बरेली की बर्फी', 'लूडो' अशा सिनेमात राजकुमार रावने साकारलेल्या भूमिका लक्षात राहिल्या. आता राजकुमारच्या आगामी सिनेमाची घोषणा झालीय. 'श्रीकांत' असं या सिनेमाचं नाव असून या सिनेमात राजकुमार श्रीकांत बोल्ला या उद्योगपतीची भूमिका साकारणार आहे.

'श्रीकांत' सिनेमाची गेल्या अनेक दिवसांपासून उत्सुकता होती. अखेर या सिनेमाचा पहिला घोषणा व्हिडीओ समोर आलाय. व्हिडीओत पाहायला मिळतं की. राजकुमार आनंदात धावताना दिसतोय. "तुमचे डोळे उघडणारा प्रेरणादायी प्रवास, तुम्हा सर्वांचा दृष्टीकोन बदलायला येतोय श्रीकांत" असं कॅप्शन देत हा खास व्हिडीओ शेअर करण्यात आलाय. राजकुमार सिनेमात अंध उद्योगपती श्रीकांत बोल्ला यांची भूमिका साकारताना दिसणार आहे. सिनेमात राजकुमारसोबत मराठमोळा अभिनेता शरद केळकरही झळकणार आहे.

श्रीकांत बोल्ला हे भारतीय उद्योगपती असून त्यांचा जन्म १९९२ साली हैदराबादमध्ये झाला.  त्यांनी त्यांच्या अंधत्वावर मात करुन मोठा व्यवसाय निर्माण केला. त्यांनी Bollant Industries ची स्थापना केली. या इंडस्ट्रीत दिव्यांग लोकांना रोजगार उपलब्ध करण्यात आला. या इंडस्ट्रीच्या माध्यमातून श्रीकांत हे इको फ्रेंडली उत्पादनांची निर्मिती करतात. श्रीकांत यांचा हाच प्रेरणादायी प्रवास 'श्रीकांत' सिनेमातून पाहायला मिळणार आहे. १० मेला हा सिनेमा रिलीज होतोय. 

 

टॅग्स :राजकुमार रावशरद केळकरबॉलिवूड