Join us
Daily Top 2Weekly Top 5

राजकुमार राव-जान्हवीचा 'Mr And Mrs Mahi' सिनेमा पाहा फक्त ९९ रुपयांत; कधी आणि कुठे? वाचा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2024 18:04 IST

'मिस्टर अँड मिसेस माही' सिनेमा ३१ मे रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.

राजकुमार राव आणि जान्हवी कपूर मुख्य भूमिकेत असलेला बहुचर्चित 'मिस्टर अँड मिसेस माही' सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या सिनेमाची गेल्या कित्येक दिवसांपासून प्रेक्षक वाट बघत होते. अखेर हा बहुप्रतिक्षित सिनेमा ३१ मे रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी 'मिस्टर अँड मिसेस माही' सिनेमाच्या टीमकडून प्रेक्षकांसाठी खास ऑफर देण्यात आली आहे. 

'मिस्टर अँड मिसेस माही' सिनेमातून एका क्रिकेटवेड्या कपलची गोष्ट मोठ्या पडद्यावर दाखविण्यात येणार आहे. या सिनेमाच्या निमित्ताने पहिल्यांदाच राजकुमार राव आणि जान्हवी कपूर ही फ्रेश जोडी चाहत्यांना पाहायला मिळणार आहे. याबरोबरच सिनेमाच्या निर्मात्यांकडून चाहत्यांना खास ऑफर देण्यात आली आहे. प्रदर्शनाच्या दिवशी 'मिस्टर अँड मिसेस माही' सिनेमाचं तिकीट अवघ्या ९९ रुपयांना मिळणार आहे. त्यामुळे ९९ रुपयांत हा नवा कोरा सिनेमा प्रेक्षकांना थिएटरमध्ये पाहता येणार आहे. 

सिनेमा लव्हर्स डेनिमित्त ही खास ऑफर 'मिस्टर अँड मिसेस माही' सिनेमाच्या निर्मात्यांकडून देण्यात आली आहे. पण, ही ऑफर केवळ ३१ मे या एका दिवसाकरिताच मर्यादित आहे. त्यामुळे फक्त ३१ मे रोजी(शुक्रवारी) 'मिस्टर अँड मिसेस माही' सिनेमाचं तिकीट ९९ रुपयांमध्ये उपलब्ध असणार आहे. 

क्रिकेटर होण्याची इच्छा असलेल्या मिस्टर माहीला वडिलांमुळे त्याच्या स्वप्नांवर पाणी सोडावं लागतं. पण, त्याची डॉक्टर बायकोही क्रिकेटची चाहती असते. आपलं अधुरं स्वप्न मिस्टर माही बायकोकडून पूर्ण करायचं ठरवतो. आणि मिसेस माहीला क्रिकेटर बनवण्याचं स्वप्न बघतो. माही कपलचा हा प्रवास 'मिस्टर अँड मिसेस माही' सिनेमातून रंजकरित्या दाखविण्यात येणरा आहे. या सिनेमाची निर्मिती करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शनने केली आहे. तर शरण शर्मा यांनी सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. 

टॅग्स :राजकुमार रावजान्हवी कपूरसिनेमा