Join us
Daily Top 2Weekly Top 5

सौरव गांगुलीच्या बायोपिकमध्ये दिसणार राजकुमार राव; म्हणाला, "खूप मजा येणारे..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2025 18:31 IST

राजकुमार यासाठी योग्य आहे असं स्वत: सौरव गांगुलींनीच प्रतिक्रिया दिली आहे.

भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार आणि बीसीसीआयचे माजी अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) यांचा बायोपिक मोठ्या पडद्यावर येणार आहे. सौरव गांगुली यांना सगळे दादा म्हणून हाक मारतात. अभिनेता राजकुमार राव (Rajkumar Rao) सौरव गांगुली यांची भूमिका साकारताना दिसणार आहे. तसंच इतर स्टारकास्टही फायनल करण्यात आली आहे. राजकुमार यासाठी योग्य आहे असं स्वत: सौरव गांगुलींनीच प्रतिक्रिया दिली आहे. तर आता राजकुमार रावनेही यावर शिक्कामोर्तब केलं आहे.

'एनडीटीव्ही'ला दिलेल्या मुलाखतीत राजकुमार राव म्हणाला, "हो, मी ही बायोपिक करत आहे. मी लहानपणापासून क्रिकेट खेळत आलोय. खूप मजा येणार आहे. नक्कीच ही आव्हानात्मक भूमिका असणार आहे. त्यामुळे मी थोडा नर्व्हस आहे. पण त्यापेक्षा जास्त उत्साहित आहे." गांगुलीच्या क्रिकेट करिअरमधील अनेक ऐतिहासिक क्षण पडद्यावर पाहायला मिळतील यासाठी क्रिकेटप्रेमी आता उत्सुक आहेत. लॉर्ड्सवर गांगुलीने शर्ट काढून केलेलं सेलिब्रेशन तर क्रिकेटप्रेमींच्या आजही लक्षात आहे. 

राजकुमार रावने त्याच्या करिअरमध्ये याआधीही अनेक बायोपिक केल्या आहेत. 'श्रीकांत','शाहिद', 'अलीगढ','ओमेर्ता और चिट्टगोंग','बोस' या सिनेमांचा समावेश आहे. तर आता तो सहावी बायोपिक करायला जात आहे. तसंच अॅडव्होकेट उज्वल निकम यांच्यावर आधारित बायोपिकवरही त्याच्याशी चर्चा सुरु आहे असं तो म्हणाला.

राजकुमार राव आगामी 'मालिक' सिनेमात दिसणार आहे.  यामध्ये तो कधीही न पाहिलेल्या अशा अँग्री आणि अॅक्शन अवतारात आहे. मानुषी छिल्लक यामध्ये मुख्य अभिनेत्री आहे. ११ जुलै रोजी 'मालिक' प्रदर्शित होणार आहे. 

टॅग्स :राजकुमार रावसौरभ गांगुलीबॉलिवूडआत्मचरित्र