Join us

ऐश्वर्या धनुषपासून वेगळी झाल्यानंतर अशी झालीय वडील रजनीकांत यांची अवस्था

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2022 14:13 IST

रजनीकांत (Rajinikanth)यांची मुलगी ऐश्वर्या (Aishwarya)आणि धनुष(Dhanush) यांनी लग्नाच्या १८ वर्षानंतर एकमेकांपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला.

रजनीकांत  (Rajinikanth)यांची मुलगी ऐश्वर्या  (Aishwarya)आणि धनुष(Dhanush) यांनी लग्नाच्या १८ वर्षानंतर एकमेकांपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला. दोघांमध्ये असे काय घडले की लग्नाच्या 18 वर्षानंतर त्यांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला. पण मुलगी आणि जावयाच्या या निर्णयाने रजनीकांत चांगलेच नाराज झाल्याची बातमी आहे. ऐश्वर्या आणि धनुष पुन्हा एकदा एकत्र यावेत अशी रजनीकांतची इच्छा असून त्यासाठी त्यांनी प्रयत्नही सुरू केले आहेत.

धनुष आणि ऐश्वर्याने एकत्र यावे अशी दोन्ही कुटुंबांची इच्छा आहे17 जानेवारीला धनुष (Dhanush) आणि ऐश्वर्या(Aishwarya) ने एक पोस्ट शेअर करून चाहत्यांना ही माहिती दिली. धनुषचे वडील कस्तुरी राजा यांनी ऐश्वर्या आणि धनुषच्या या निर्णयाला 'कौटुंबिक भांडण' मानले. त्याचवेळी, सुपरस्टार रजनीकांत (Rajinikanth)  यांना मुलगी-जावईचं घर तुटल्याच्या बातमीने मोठा धक्का बसला आहे.

धनुष-ऐश्वर्या वेगळे झाल्यानंतर रजनीकांत अस्वस्थ!Wionच्या रिपोर्टनुसार, सुभाष के झा यांना एका सूत्राने माहिती दिली आहे की रजनीकांत यांच्यावर त्यांच्या मुलीच्या संसार तुटल्याच्या बातमीमुळे अस्वस्थ झाले आहेत. ऐश्वर्या आणि धनुषने आपले मतभेद दूर करून पुन्हा एकत्र यावे अशी रजनीकांतची इच्छा आहे.

दोघांमध्ये आहेत मतभेदअसे बोलले जात आहे की, धनुष आणि ऐश्वर्यामध्ये भांडण होण्याची ही पहिलीच वेळ नाही, दोघांमध्ये टोक्याचे मतभेद' आहेत. धनुष आणि ऐश्वर्याचे लग्न यापूर्वी अनेकवेळा तुटले. यापूर्वीही या दोघांमध्ये अनेकवेळा मतभेद झाले होते, मात्र प्रत्येक वेळी रजनीकांतने यांनी संभाळले. 

रजनीकांत यांच्याकडून कोणतेही वक्तव्य आलेले नाहीमात्र, ऐश्वर्या आणि धनुषच्या या निर्णयाबाबत रजनीकांत यांनी अद्याप कोणतेही वक्तव्य केलेले नाही. ज्येष्ठ अभिनेते रजनीकांत अखेरच्या पोंगलच्या शुभेच्छा देताना दिसले होते. 

टॅग्स :रजनीकांतधनुषTollywood