Join us
Daily Top 2Weekly Top 5

राजेश खन्ना यांना पडला पत्नीचा विसर; 'या' दिग्गज अभिनेत्रींच्या नावे केली सगळी संपत्ती

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2023 18:31 IST

Rajesh khanna: बॉलिवूडमधील दोन लोकप्रिय अभिनेत्रींना राजेश खन्ना यांची संपत्ती मिळाली.

बॉलिवूडचा एक काळ गाजवणारा अभिनेता म्हणजे राजेश खन्ना (rajesh khanna).  उत्तम अभिनयशैलीच्या जोरावर त्यांनी बॉलिवूडला अनेक सुपरहिट सिनेमा दिले. त्यामुळे सोशल मीडियावर त्यांच्याविषयी आजही चर्चा रंगते. काका या नावाने प्रसिद्ध असलेल्या राजेश खन्ना यांनी त्या काळात अनेक प्रॉपर्टी कमावली. परंतु, या प्रॉपर्टीमधून त्यांनी त्यांची पत्नी अभिनेत्री डिंपल कपाडिया यांनाच बेदखल केलं. इतकंच नाही तर त्यांच्या जागी संपूर्ण रक्कम बॉलिवूडमधील दोन प्रसिद्ध अभिनेत्रींच्या नावे केली.

राजेश खन्ना यांच्या अभिनयाचे लाखो चाहते होते. त्यामुळे त्यांच्या दारापुढे दिग्दर्शक, निर्मात्यांच्या रांगा लागायच्या. परंतु, एक काळ असा आला जिथे त्यांचं स्टारडम फिकं पडलं. त्यांच्याकडे सिनेमाच्या ऑफर्स येणं जवळपास बंद झालं. तर, दुसरीकडे त्यांच्या वैवाहिक जीवनातही वादळ आलं होतं. लग्नाच्या काही वर्षांमध्येच त्यांची पत्नी डिंपल कपाडिया या त्यांना सोडून दोन मुलींसोबत वेगळ्या राहू लागल्या होत्या. राजेश खन्ना आणि डिंपल यांनी एकमेकांना घटस्फोट दिला नव्हता. मात्र, तरी ते वेगळे राहत होते.

१९७३ मध्ये या जोडीने लग्न केलं. मात्र, १९८४ पासून ही जोडी विभक्त राहू लागले. डिंपल यांनी घर सोडल्यानंतर राजेश खन्ना अनिता अडवाणीसोबत लिव्ह-इन रिलेशनशीपमध्ये राहत असल्याचं म्हटलं जातं. विशेष म्हणजे राजेश खन्ना यांना कर्करोगाचं निदान झाल्यानंतर डिंपल त्यांच्याकडे पुन्हा परतल्या आणि त्यांची काळजी घेऊ लागल्या. मात्र, शेवटच्या दिवसात डिंपल यांनी साथ दिल्यानंतरही राजेश खन्ना यांनी त्यांच्या संपत्तीमधील एकही रुपया अभिनेत्रीला दिला नाही.कोणाला मिळाली राजेश खन्नाची प्रॉपर्टी?

राजेश खन्ना यांनी त्यांची संपूर्ण प्रॉपर्टी त्यांच्या लेकी ट्विंकल आणि रिंकी यांच्या नावावर केल्या. या संपत्तीमध्ये त्यांचा आशीर्वाद बंगला, बँक अकाऊंट्स आणि अन्य ठिकाणी गुंतवणूक करुन ठेवलेली संपत्ती या सगळ्याचा समावेश आहे. राजेश खन्ना यांनी बराच काळ कर्करोगाशी लढा दिला. मात्र, १८ जुलै २०१२ रोजी त्यांची प्राणज्योत मालवली. 

टॅग्स :राजेश खन्नाट्विंकल खन्नाडिम्पल कपाडियाबॉलिवूडसेलिब्रिटी