Join us

पत्रकार व चित्रपट समीक्षक राजीव मसंद कोरोना पॉझिटीव्ह, प्रकृती गंभीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2021 13:09 IST

लवकर बरे व्हा...; सुनील शेट्टी, दिया मिर्झासह अनेक बॉलिवूड स्टार्सने केली प्रार्थना

ठळक मुद्देपत्रकारितेत असताना राजीव यांनी अनेक फिल्मी इव्हेंट कव्हर केलेत. कान्स फिल्म फेस्टिवलपासून तर अशा अनेक फिल्मी सोहळ्यांचे वृत्तांकन त्यांनी केले.

ज्येष्ठ पत्रकार व चित्रपट समीक्षक राजीव मसंद यांना कोरोनाची लागण झाली असून त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे कळते. राजीव यांच्यावर सध्या मुंबईच्या कोकिळाबेन रूग्णालयात उपचार सुरू आहेत.काही दिवसांपूर्वी राजीव यांना कोरोनाची लागण झाली होती. यादरम्यान हळूहळू त्यांची प्रकृती बिघडली. शरीरातील आॅक्सिजनचे प्रमाण कमी झाले. प्रकृती बिघडल्याने त्यांना तातडीने रूग्णालयात भरती करण्यात आले. रिपोर्टनुसार, राजीव मसंद यांची प्रकृती अत्यंत नाजूक असून त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे.

सुनील शेट्टी, दिया मिर्झाने ट्विट करत, राजीव मसंद हे लवकर बरे व्हावेत, अशी प्रार्थना केली आहे.

राजीव मसंद दीर्घकाळापासून मनोरंजन विश्वास काम करत आहेत. चित्रपट विश्वात समीक्षक म्हणून त्यांची ओळख आहे.टाइम्स आॅफ इंडिया, इंडियन एक्सप्रेस, स्टार न्यूज, सीएनएन आयबीएन अशा विविध वृत्तपत्रांत व टीव्ही वाहिन्यांमध्ये 25 वर्षांपेक्षा अधिक काळ पत्रकारिता केल्यानंतर अलीकडे राजीव मसंद करण जोहर व बंटी सचदेवच्या ‘धर्मा कॉर्नरस्टोन एजन्सी’मध्ये सीओओ म्हणून रूजू झाले होते.

पत्रकारितेत असताना राजीव यांनी अनेक फिल्मी इव्हेंट कव्हर केलेत. कान्स फिल्म फेस्टिवलपासून तर अशा अनेक फिल्मी सोहळ्यांचे वृत्तांकन त्यांनी केले. यादरम्यान बॉलिवूडपासून हॉलिवूडपर्यंत अनेक बड्या फिल्मी स्टार्सच्या मुलाखती घेण्याची संधी त्यांना मिळाली,

टॅग्स :बॉलिवूड