कोरोना महामारीने देशाच्या चिंता वाढवल्या आहेत. पहिल्या लाटेने लोकांचे रोजगार हिरावले, स्थलांतरित मजुरांचे हाल केलेत. दुसरी लाट लोकांच्या जीवावर उठली आहे. औषधांचा तुटवडा, हॉस्पीटलमध्ये बेडची कमतरता आणि प्राणवायुअभावी कोरोना रूग्णांचे नातेवाईक सैरभैर झाले आहेत. अनेक निष्पापांचे बळी जात आहेत आणि अशात राजस्थानचे आरोग्यमंत्री डॉ़ रघु शर्मा (Dr. Raghu Sharma) सलमान खानच्या (Salman Khan) बॉडीगार्डला भेटलो, म्हणून शेखी मिरवत आहेत. सध्या या आरोग्यमंत्र्यांवर सोशल मीडियावर जबरदस्त टीका होतेय. लोकांसाठी वेळ नाही मग सेलिब्रिटींच्या बॉडीगार्डला भेटायला कसा वेळ मिळाला?अशा शब्दांत लोकांनी त्यांना सुनावले आहे.
डॉ. रघु शर्मा यांनी ट्विटरवर एक फोटो पोस्ट करुन सलमान खानच्या बॉडिगार्डला भेटल्याची माहिती दिली. ‘आज मी गुरमित सिंह जॉली उर्फ शेरा यांची भेट घेतली,’ असे ट्विट शर्मा शेअर केले. त्यांचे हे ट्विट पाहून नेटकरी संतापले.