बॉलिवूड अभिनेता अमिताभ बच्चन (amitabh bachchan) यांच्या दमदार अभिनयाची कायमच चर्चो होते. मात्र, बिग बी त्यांच्या दमदार अभिनयासोबतच शिस्त, वक्तशीरपणा, नियमांचं पालन आणि प्रोफेशनल लाइफ यामुळेही ओळखले जातात. जवळपास ५ दशकांपेक्षा जास्त काळ इंडस्ट्रीत घालवणारे बिग बी आज अनेक नवोदित कलाकारांसाठी आदर्श आहेत. अलिकडेच अभिनेता राजा बुंदेला यांनी बिग बींविषयी भाष्य केलं. यावेळी त्यांनी अमिताभ यांच्या शिस्तबद्ध जीवनशैलीचा एक किस्सा सांगितला.
राज बुंदेला याने डियर जेनरेशन या पॉडकास्टला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये बोलत असतांना त्याने अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव कसा होता हे सांगितलं. "अमिताभ बच्चन कधीही सेटवर येण्यापूर्वीच त्यांचे डायलॉग्स सगळे पाठ असतात. ते कधीच सेटवर आल्यानंतर त्यांच्या स्क्रिप्टवरुन गोंधलेले नसतात. त्यांची तयारी इतकी परफेक्ट असते की कोणत्याही सीनच्या शूटवेळी ते कधीच चुकत नाहीत किंवा कोणतीही अडचण त्यांना येत नाही", असं राजा बुंदेला म्हणाला. पुढे त्याने बिग बींविषयी एक रंजक किस्साही सांगितला. बिग बींच्या घरी रात्री ८ नंतर कोणालाही यायला परवानगी नसते असं त्याने सांगितलं.
रात्री ८ नंतर बिग बींच्या घरात नो एन्ट्री
"अमिताभ बच्चन फक्त प्रोफेशनल लाइफमध्येच नाही तर पर्सनल आयुष्यातही नियम आणि शिस्तीचं पालन करतात. काम आणि कुटुंब यांच्यातील अंतर त्यांनी कायम जपलं आहे. त्यामुळे रात्री ८ नंतर त्यांच्या घरी इंडस्ट्रीतील कोणत्याही व्यक्तीला जाण्यास परवानगी नाही. रात्री ८ नंतर ते त्यांचा सगळा वेळ कुटुंबाला देतात," असं राजा बुंदेला म्हणाला. दरम्यान, आजवरच्या कारकिर्दीत अमिताभ यांनी अनेक सुपरहिट सिनेमाबॉलिवूडला दिले आहेत. इतकंच नाही तर छोट्या पडद्यावरील कौन बनेगा करोडपती हा शो सुद्धा त्यांनी गाजवला आहे.
Web Summary : Actor Raja Bundela revealed Amitabh Bachchan's disciplined lifestyle. Bachchan is punctual, professional, and dedicated. No industry guests are allowed at his home after 8 PM, as that time is reserved for family.
Web Summary : अभिनेता राजा बुंदेला ने अमिताभ बच्चन की अनुशासित जीवनशैली का खुलासा किया। बच्चन समय के पाबंद, पेशेवर और समर्पित हैं। रात 8 बजे के बाद उनके घर पर किसी भी इंडस्ट्री के मेहमानों को अनुमति नहीं है, क्योंकि वह समय परिवार के लिए आरक्षित है।