Join us

"ती शेवटच्या क्षण सतत माफी...", राज बब्बर यांनी स्मिता पाटीलसोबतच्या अंतिम क्षणांचा केला खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2025 16:17 IST

घरातून रुग्णालयात जाईपर्यंत ती सतत... राज बब्बर यांचा खुलासा

भारतीय सिनेमाच्या इतिहासातील सर्वात लोकप्रिय अभिनेत्रींचं नाव घ्यायचं तर त्याच स्मिता पाटील (Smita Patil) यांचं नाव आवर्जुन येतं. त्यांचा अभिनय, सौंदर्य सगळंच अप्रतिम होतं. खूप कमी वयात त्यांनी जगाचा निरोप घेतला. १९८३ साली त्यांनी अभिनेते राज बब्बर (Raj Babbar) यांच्यासोबत लग्न केलं होतं. १९८६ साली त्यांना मुलगा झाला. मात्र लेकाच्या जन्मानंतर त्यांना बऱ्याच कॉम्पिल्केशनला सामोरं जावं लागलं आणि त्यांचा मृत्यू झाला. स्मिता पाटील यांच्या अंतिम क्षणांविषयी राज बब्बर यांनी एका मुलाखतीत प्रतिक्रिया दिली होती.

रेडिफ डॉट कॉमला दिलेल्या मुलाखतीत स्मिता पाटील यांच्या शेवटच्या क्षणांबद्दल राज बब्बर म्हणाले, "घरातून रुग्णालयात जाईपर्यंत ती सतत माफी मागत होती आणि सगळं ठीक होईल असा मी तिला धीर देत राहिलो. तिने माझ्याकडे पाणावलेल्या डोळ्यांनी पाहिलं. तिच्या ना नजरेतून मला सगळं काही कळलं. एक तासानंतर डॉक्टर बाहेर आले आणि त्यांनी सांगितलं की स्मिता कोमामध्ये आहे."

स्मिता पाटील यांच्यासोबतच्या घट्ट नात्याविषयी ते म्हणाले, "मी तिचाच एक भाग होतो आणि ती माझा भाग होती.तुम्ही कितीही स्ट्राँग असलात तरी अशी व्यक्ती जी तुमचं आयुष्यच आहे ती व्यक्ती निघून गेली तर साहजिकच तुम्हाला तिची आठवत येत राहणार. माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत तिच्या आठवणी माझ्यासोबत असणार आहेत."

स्मिता पाटील यांच्या निधनानंतर राज बब्बर यांनी पुन्हा आपल्या पहिल्या पत्नीशी लग्न केलं होतं. त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. तर स्मिता पाटीलपासून त्यांना प्रतीक बब्बर हा मुलगा आहे. प्रतीकचं त्याच्या सावत्र भावंडांसोबतही चांगलं नातं आहे.

टॅग्स :राज बब्बरस्मिता पाटीलबॉलिवूड