Join us
Daily Top 2Weekly Top 5

लग्न कधी आहे? पत्रकाराने प्रश्न विचारताच राघव चढ्ढा लाजले, म्हणाले…

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2023 14:10 IST

परिणीतीसोबतच्या लग्नाबद्दल विचारल्यावर राघव चढ्ढा यांनी हसून दिलेली प्रतिक्रिया चर्चेत आहे. 

 सध्या सर्वात जास्त चर्चेत असलेली जोडी म्हणजे अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि राघव चढ्ढा. सप्टेंबर महिन्यात परिणीती आणि राघव यांचा विवाहसोहळा पार पडणार असल्याचं वृत्त आहे. चोप्रा आणि चड्ढा कुटुंबीयांना त्यांच्या शाही विवाहसोहळ्याची तयारीही सुरू केली आहे. दोघांच्या लग्नाची पत्रिकाही समोर आली आहे. यातच परिणीतीसोबतच्या लग्नाबद्दल विचारल्यावर राघव चढ्ढा यांनी हसून दिलेली प्रतिक्रिया चर्चेत आहे. 

पत्रकार परिषदेदरम्यान पत्रकारांनी  राघव चढ्ढा यांना विचारले की,  18 सप्टेंबरपासून लग्नाची तयारी सुरू होणार असल्याची बातमी आहे. लग्नाबद्दल प्रश्न ऐकून राघव लाजले. या प्रश्नावर हसत राघव म्हणाले, 'लग्नाबद्दल तुम्हा सर्वांना लवकरच सर्व माहिती मिळेल. यावेळी राघव आधी हसले आणि नंतर गालातल्या गालात लाजले. परिणीती आणि राघव यांचा १३ मे रोजी साखरपुडा पार पडला. आता २५ सप्टेंबरला ते विवाहबंधनात अडकणार आहेत. 

एकीकडे लग्नाची जोरदार तयारी सुरू असताना दुसरीकडे परिणीती आणि राघव देवदर्शन करत आहेत. महिनाभरापूर्वीच परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांनी उजैन येथील महाकालेश्वर मंदिराला भेट देत महादेवाचं दर्शन घेतलं. यावेळी परिणीतीने गुलाबी रंगाची साडी नेसली होती. तर राघव चड्ढा यांनी पारंपरिक लूक केला होता. महादेवाच्या मंदिरात परिणीती आणि राघव चड्ढा नतमस्तक झाले. त्यांनी मंदिरात आरतीही केली. त्यांचे महाकालेश्वर मंदिरातील फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. याआधीही राघव व परिणीती अमृतसरमधील सुवर्णमंदिरात एकत्र दिसून आले होते.

परिणीती राघव यांच्या लव्हस्टोरीबद्दल सांगायचं तर, परिणीती आणि राघव यांचं एकाच कॉलेजमध्ये शिक्षण झालं. दोघेही यूकेमध्ये शिकत असल्यापासून एकमेकांना ओळखत होते. परिणीती आणि राघव दोघेही जानेवारीत लंडनमध्ये झालेल्या पहिल्या इंडिया यूके आऊटस्टँडिंग अचिव्हर्स अवॉर्ड्समध्ये सहभागी झाले होते. 

टॅग्स :परिणीती चोप्राबॉलिवूड