Join us

तुझा अभिमान वाटतो...! आर. माधवनच्या लेकानं देशाचं नाव उंचावलं, जिंकलं रौप्य पदक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2022 13:58 IST

R. Madhavan : आर. माधवन हा चाहत्यांचा लाडका अभिनेता. माधवनला चाहत्यांचं भरभरून प्रेम मिळालं. या ना त्या निमित्तानं आर. माधवनची चर्चा होत असते. पण तूर्तास चर्चा त्याच्या लेकाची आहे.

आर. माधवन (R. Madhavan) हा चाहत्यांचा लाडका अभिनेता. माधवनला चाहत्यांचं भरभरून प्रेम मिळालं. या ना त्या निमित्तानं आर. माधवनची चर्चा होत असते. पण तूर्तास चर्चा त्याच्या लेकाची आहे. होय, माधवनचा लेक वेदांतनं (R. Madhavan son Vedaant ) केलेल्या कामगिरीमुळे त्याच्या आईवडिलांसह देशाचं नाव उज्ज्वल झालं आहे. पुन्हा एकदा कोपेनहेगनमध्ये डेन्मार्क ओपनमध्ये (Danish Open 2022 ) रौप्य पदक पटकावत त्याने देशाची मान उंचावली आहे.

वेदांत हा जलतरणपटू आहे. गेल्यावर्षी देखील वेदांतने बेंगळुरू येथे झालेल्या 47 व्या ज्युनिअर नॅशनल अ‍ॅक्वाटिक चॅम्पियनमध्ये चार रौप्य पदकांसह तीन कांस्य पदके पटकावली होती. गेल्यावर्षी मार्चमध्ये लॅटव्हियन ओपन स्विमिंग चॅम्पियन्स स्पर्धेत कांस्यपदकाची कमाई केली होती.

 तुझा अभिमान आहे...लेकांच्या अशा कामगिरीनं कुठल्याही बापाचा ऊर अभिमानानं भरून येईल. आर. माधवन हा सुद्धा याला अपवाद नाही. डेन्मार्क ओपनचा एक व्हिडीओ माधवनने शेअर केला आहे. यात त्याचा मुलगा वेदांत याला रौप्य पदक देऊन गौरिवण्यात येतंय. आम्हा सगळ्यांना तुझा सार्थ अभिमान आहे, असं हा व्हिडीओ शेअर करताना माधवनने लिहिलं आहे. त्याच्या या पोस्टनंतर बॉलिवूडच्या अनेक सेलिब्रिटींनी त्याचं अभिनंदन केलं आहे. शिल्पा शेट्टी, ईशा देओल, नम्रता शिरोडकर, दर्शन कुमार आदिंनी वेदांतला शुभेच्छा दिल्या आहेत.

गेल्या वर्षी वेदांतच्या 16 व्या वाढदिवशी आर. माधवनने लेकासाठी एक खास पोस्ट शेअर केली होती. ‘ज्या गोष्टींमध्ये मी पुढे होतो, त्या सर्व गोष्टींमध्ये मला मागे टाकल्याबद्दल धन्यवाद. माझी छाती गर्वाने फुगते. मी दरवेळी तुझ्याकडून नवं काही शिकतो. तू चांगला माणूस बनशील, अशी मला आशा आहे. मी एक भाग्यशाली बाप आहे,’अशा भावना आर माधवनने व्यक्त केल्या होत्या.  

टॅग्स :आर.माधवनबॉलिवूड