Join us
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO: अल्लू अर्जून पत्नी अन् मुलीसह सर्वसामान्यांप्रमाणे रांगेत, साधेपणानं पुन्हा जिंकलं सर्वांचं मन!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2022 18:45 IST

साऊथचा सुपरस्टार अल्लू अर्जुनची पत्नी स्नेहा रेड्डीचा आज 37 वा वाढदिवस आहे. या खास प्रसंगी अल्लू अर्जून आपल्या कुटुंबासह अमृतसरच्या सुवर्ण मंदिरात दर्शनासाठी पोहोचला आहे.

साऊथचा सुपरस्टार अल्लू अर्जुनची पत्नी स्नेहा रेड्डीचा आज 37 वा वाढदिवस आहे. या खास प्रसंगी अल्लू अर्जून आपल्या कुटुंबासह अमृतसरच्या सुवर्ण मंदिरात दर्शनासाठी पोहोचला आहे. ज्याचा एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये अर्जून कुटुंबासोबत मंदिराच्या रांगेत दिसून येतो. यावेळी तो पारंपारिक लूकमध्ये दिसला. सर्वसामान्यांप्रमाणे असं रांगेत उभं राहून दर्शन घेण्याचा साधेपणा अल्लूच्या चाहत्यांना भावला आहे. चाहते अल्लू अर्जूनचं कौतुक करत आहेत. 

व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेल की अर्जुनसारखा सुपरस्टार इतर भक्तांसोबत आहे आणि तो एका सामान्य माणसासारखा रांगेत कुटुंबासोबत उभा आहे. मानव मंगलानी यांनी कॅप्शनसह व्हिडिओ पोस्ट केला आहे. "पत्नी स्नेहा रेड्डीचा वाढदिवस साजरा करताना #AlluArjun इतरांसोबत रांगेत दिसला. अल्लू अर्जूननं कुटुंबासह सुवर्ण मंदिरात आशीर्वाद घेतला", अशा कॅप्शनसह व्हिडिओ सोशल मीडिया व्हायरल झाला आहे. तसंच काही फोटोही समोर आले आहेत. 

२०२१ मध्ये अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा: द राइज' चित्रपटानं नवा विक्रम केला. बॉक्स ऑफीसवर पुष्पा सिनेमा ब्लॉकबस्टर ठरला. सुकुमार दिग्दर्शित चित्रपट रिलीज झाल्यापासून चाहते 'पुष्पा: द रुल' या सिक्वेलची वाट पाहत आहेत.

टॅग्स :अल्लू अर्जुनपुष्पा