Join us

Pushpa 2: 'पुष्पा: द रूल'मधल्या भंवर सिंह शेखावतचा फर्स्ट लूक आला समोर, खतरनाक अवतारात दिसला फहाद फासिल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2023 10:59 IST

Pushpa 2 : 'पुष्पा २'मधील फहाद फासिलचा लूक चाहत्यांना भावतो आहे.

साऊथचा स्टार अल्लू अर्जुन(Allu Arjun)चा पुष्पा (Pushpa) या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घातला होता. या चित्रपटाने चांगलीच कमाई केली होती. वास्तविक हा चित्रपट कोरोनाच्या कालावधीनंतर मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झाला होता. त्यामुळे चित्रपटाला दमदार प्रतिसाद मिळाला होता. मात्र प्रेक्षकांमध्ये या चित्रपटाची क्रेझ कमी झालेली नाही. लोक अजूनही पुष्पाचे लूक आणि डायलॉग्स रिपीट करताना दिसतात. या चित्रपटात अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना(Rashmika Mandanna)ची केमिस्ट्री खूपच भावली होती. त्यानंतर आता प्रेक्षक या चित्रपटाच्या दुसऱ्या भागाची म्हणजेच पुष्पा २ (Pushpa 2)ची आतुरतेने वाट पाहत आहेत. अलीकडेच निर्मात्यांनी पुष्पाचा सर्वात मोठा शत्रू भंवर सिंग म्हणजेच फहाद फासिल(Fahad Faasil)चा फर्स्ट लूक रिलीज करण्यात आला आहे.

देशभरात पुष्पा रिलीज झाल्यानंतर जेव्हा निर्मात्यांनी पुष्पा २ची घोषणा केली तेव्हा निर्माते चित्रपट प्रदर्शित करण्यास उत्सुक होते आणि प्रेक्षक तो पाहण्यासाठी उत्सुक होते. काही काळापूर्वी पुष्पराजचा फर्स्ट लूक रिलीज झाला होता, ज्यामध्ये तो खूप वेगळ्या अंदाजात दिसला होता. त्यानंतर पुष्पाचा टीझर रिलीज झाला ज्यामध्ये अल्लू अर्जुनचा दमदार अवतार दिसला. आता निर्मात्यांनी फहाद फासिलचा नवीन लूक त्याच्या वाढदिवसानिमित्त रिलीज केला आहे, जो पाहून चाहत्यांची उत्सुकता आणखी वाढली आहे.

फहाद फासिलचा 'पुष्पा २' मधील लूक चर्चेत

फहाद हा पुष्पा - द राइजचा एक भाग होता, ज्यामध्ये त्याने पोलीस अधिकारी भंवर सिंग शेखावत यांची भूमिका केली होती. त्याच्या या पात्राला चाहत्यांचे खूप प्रेम मिळाले आणि आता याच प्रेमाने तो 'पुष्पा २'मधून पुनरागमन करत आहे. IPS अधिकारी भंवर सिंह शेखावत उर्फ ​​फहाद फासिलचा पुष्पा २ मधील लूक खूपच खतरनाक आहे. त्याच्या पहिल्या पोस्टरमध्ये निर्मात्यांनी त्याला सिगार ओढताना दाखवले आहे.

पुष्पा २च्या निर्मात्यांनी फहाद फासिलचा इंटेस लूक ट्विटरवर शेअर करत लिहिले की, पुष्पा २ - द रुलची संपूर्ण टीम बहु प्रतिभाशाली टॅलेंटेड अभिनेता फहाद फासिलला वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. फहाद फासिलचा हा लूक त्याच्या चाहत्यांनी खूप भावला आहे. 

टॅग्स :पुष्पाअल्लू अर्जुनरश्मिका मंदाना