Join us

Pushpa 2 : बदला घेण्यासाठी येतोय भंंवर सिंह...! 'पुष्पा २'च्या सेटवरील फोटो आला समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2023 15:33 IST

Pushpa 2 : 'पुष्पा 2' चित्रपटाच्या दुसऱ्या भागाची प्रत्येकजण आतुरतेने वाट पाहत आहे. त्याचे शूटिंग सुरू असून आता सेटवरून फहादचा एक नवीन फोटो समोर आला आहे

'पुष्पा' (Pushpa 2) हा चित्रपट दोन वर्षांपूर्वी प्रदर्शित झाला होता. सुकुमार दिग्दर्शित या चित्रपटाला प्रेक्षकांचे प्रचंड प्रेम मिळाले. अल्लू अर्जुनपासून ते रश्मिका मंदान्ना आणि फहाद फाजील(Fahadh Faasil)पर्यंत सर्वांची मने आपल्या दमदार अभिनयाने जिंकली होती. आता या 'पुष्पा 2' चित्रपटाच्या दुसऱ्या भागाची प्रत्येकजण आतुरतेने वाट पाहत आहे. त्याचे शूटिंग जोरात सुरू आहे. आता सेटवरून फहादचा एक नवीन फोटो समोर आला आहे, ज्याने सोशल मीडियावर खळबळ उडवून दिली आहे. 

फहादने चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले आहे आणि हे जाणून चाहत्यांच्या आनंदाला पारावार उरला नाही. यासोबतच निर्मात्यांनी एक मोठे अपडेटही दिले आहे. फहाद फाजीलने 'पुष्पा'मध्ये एसपी भंवर सिंह शेखावत यांची भूमिका साकारली होती. शेवटच्या सीनमध्ये फहाद आणि अल्लू अर्जुन (पुष्पा राज) समोरासमोर दिसले होते. भंवर सिंगच्या डोळ्यात धगधगणारी ज्योत स्पष्ट दिसत होती. त्यावेळी तो काही करू शकला नाही, पण आता तो 'पुष्पा २' मध्ये बदला घेण्यासाठी सज्ज झाला आहे.

निर्मात्यांनी ट्विटरवर सेटवरील फहादचा एक नवीन फोटो शेअर केला आणि कॅप्शनमध्ये लिहिले, '#पुष्पा2 द रूलचे एक प्रमुख शेड्यूल 'भंवर सिंग शेखावत' उर्फ ​​फहाद फाजीलसोबत पूर्ण केले आहे. यावेळी तो सूड घेऊन परतेल.

'पुष्पा २' कधी रिलीज होणार?'पुष्पा २' कधी रिलीज होणार हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात आहे.  'पुष्पा: द रुल' सध्या निर्मितीच्या टप्प्यात आहे. चित्रपट पूर्णत्वाच्या जवळ आहे. हा चित्रपट या वर्षाच्या शेवटी किंवा पुढच्या वर्षाच्या सुरुवातीला प्रदर्शित होऊ शकतो.

टॅग्स :पुष्पाअल्लू अर्जुनरश्मिका मंदाना