Join us
Daily Top 2Weekly Top 5

Pushpa 2: अल्लू अर्जुननं 'पुष्पा 2' संदर्भात चाहत्यांना दिली नवीन अपडेट, म्हणाला...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2022 17:15 IST

Allu Arjun : अभिनेता अल्लू अर्जुन या महिन्यात पुष्पा: द रूलच्या दुसऱ्या भागाच्या शूटिंगसाठी सज्ज झाला आहे. दरम्यान त्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

२०२१ मध्ये अल्लू अर्जुन(Allu Arjun)च्या पुष्पाला कोणीही विसरू शकले नाही. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर यशाचे झेंडे उंचावले, ज्याची क्वचितच कोणी कल्पना केली असेल. हा चित्रपट पाहिल्यानंतर प्रेक्षक त्याच्या सिक्वेलची आतुरतेने वाट पाहत आहेत. प्रेक्षकांची इच्छाही पूर्ण होणार आहे. अलीकडेच, पुष्पा २ (Pushpa 2) च्या सेटवरून अल्लू अर्जुनचा एक फोटो समोर आला होता. त्याचवेळी अल्लू अर्जुनने पुष्पा २ संदर्भात खुलासा केला आहे. त्याचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

अभिनेता अल्लू अर्जुन या महिन्यात पुष्पा: द रूलच्या दुसऱ्या भागाच्या शूटिंगसाठी सज्ज झाला आहे. या चित्रपटाशी संबंधित एक इंटरेस्टिंग अपडेट शेअर करत अल्लू अर्जुनने सांगितले की, दुसऱ्या भागात नवीन काय असणार आहे. एका कार्यक्रमात पोहोचलेल्या या अभिनेत्याने चाहत्यांसाठी दुसऱ्या भागासाठी एक नवीन संवाद सांगितला. तो म्हणाला की, त्याला अपेक्षा आहे की प्रेक्षक या चित्रपटासाठी खूप उत्सुक असतील. या चित्रपटाला फिल्मफेअरमध्ये सात पुरस्कार मिळाले.

अल्लू अर्जुनचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये अल्लू अर्जुन म्हणाला, 'जर पुष्पा १ मध्ये झुकेगा नहीं साला असेल तर पुष्पा 2 मध्ये बिल्कुल झुकेगा नहीं. मला मनापासून आशा आहे की सर्वकाही सकारात्मक होईल. मी या चित्रपटाबद्दल उत्सुक आहे आणि आशा करतो की तुमचाही असाच उत्साह असेल.'

'पुष्पा: द राइज'मधील अल्लू अर्जुनचा 'मैं झुकेगा नहीं' हा डायलॉग खूप हिट झाला होता. तो इतका व्हायरल झाला की त्यावर मीम्सही बनवले जाऊ लागले. यावेळी गणेशोत्सवात पुष्पा स्टाईलमध्ये गणपतीची मूर्ती साकारण्यात आली. त्याचबरोबर 'सामी-सामी' आणि 'श्रीवल्ली' ही गाणीही चांगलीच पसंतीस उतरली होती. हिंदीतील 'पुष्पा' हा चित्रपट अभिनेता श्रेयस तळपदेने डब केला होता.

टॅग्स :अल्लू अर्जुनपुष्पा