Priyanka Chopra sold 4 flats in Mumbai: भिनेत्री प्रियंका चोप्रा (Priyanka Chopra) जिला 'देसी गर्ल'ही ओळख मिळाली ती आज ग्लोबल स्टार आहे. इतकंच नाही तर ती यशस्वी बिझनेसवुमनही आहे. प्रियंकाने अनेक ठिकाणी गुंतवणूक केली आहे. गेल्या काही वर्षांपासून ती अमेरिकेत वास्तव्यास आहे. पती निक जोनास आणि लेक मालती मेरीसह ती तिकडेच स्थायिक आहे. अधून मधून भारतात येणाऱ्या प्रियंकाने आता नुकतंच मुंबईतील ४ फ्लॅट्स एकत्रच विकले आहेत. यातून तिची करोडोंची कमाई झाली आहे.
ग्लोबल आयकॉन प्रियंका चोप्रा सध्या तिच्या प्रॉपर्टीमुळे चर्चेत आहे. इंडेक्सटॅपच्या रिपोर्टनुसार, प्रियंकाने मुंबईतील चार लक्झरी फ्लॅट्स एकत्रच विकले आहेत. अंधेरी वेस्टच्या लोखंडवाला कॉम्प्लेक्समध्ये उच्चभ्रू ओबेरॉय स्काय गार्डनर येथे हे फ्लॅट आहेत. प्रियंकाची यातून १६.१७ कोटींची कमाई झाली आहे. यातील ३ फ्लॅट्स हे १८ व्या मजल्यावर असून एक फ्लॅट १९ व्या मजल्यावर आहे. सचदेवा कुटुंबाने हे फ्लॅट्स विकत घेतले आहेत. पहिला फ्लॅट ३.४५ कोटी, दुसरा २.८५ कोटी, तिसरा ३.५२ कोटी आणि चौथा ६.३५ कोटींना विकला गेला.
काही दिवसांपूर्वीच प्रियंका भावाच्या लग्नासाठी मुंबईत आली होती. यावेळी ती महेशबाबूसोबत आगामी सिनेमात दिसणार असल्याचीही चर्चा झाली. प्रियंका ६ वर्षांपूर्वी आलेल्या 'स्काय इज पिंक' या हिंदी सिनेमात शेवटची दिसली. यानंतर फरहान अख्तरच्या 'जी ले जरा' मध्ये दिसणार आहे. मात्र अद्याप सिनेमाबाबतीत पुन्हा काहीच अपडेट आलेलं नाही. या सिनेमात प्रियंका,कतरिना आणि आलिया या तीन मुख्य अभिनेत्री असणार आहेत.