Join us
Daily Top 2Weekly Top 5

लग्नाआधीच्या रिलेशनशिपबाबत पहिल्यांदाच प्रियांका चोप्राचा मोठा खुलासा, वाईट झाले होते ब्रेकअप्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2023 14:58 IST

Priyanka Chopra : प्रियांका चोप्रा नुकतीच ‘कॉल हर डॅडी’ पॉडकास्टला मुलाखत दिली. यावेळी तिने तिच्या रिलेशनशिपबाबत मोकळेपणाने संवाद साधला. तिला यावेळी विचारण्यात आलं की, तिने रोमॅंटिक पार्टनर निवडण्यासाठी कोणता पॅटर्न फॉलो केला होता?

Priyanka Chopra : बॉलिवूड आणि हॉलिवूड स्टार प्रियांका चोप्रा आणि तिचा पती निक जोनास यांच्या रिलेशनशिपबाबत तर तुम्ही बरंच काही वाचलं असेल. प्रियांका नेहमीच त्याचं कौतुक करत असते. लग्नाच्या बऱ्याच वर्षांनंतर देसीगर्ल प्रियांकाने आपल्या आधीच्या रिलेशनशिपबाबत खुलासा केला, ज्यातून तिला फार वेदना झाल्या. एकदा नाही तर अनेकदा तिचं मन दुखावलं गेलं. इतकंच नाही तर तिला एकावेळी असं वाटू लागलं होतं की, ती एक डोरमॅट म्हणजे पायपुसनी बनून राहिली आहे.

प्रियांका चोप्रा नुकतीच ‘कॉल हर डॅडी’ पॉडकास्टला मुलाखत दिली. यावेळी तिने तिच्या रिलेशनशिपबाबत मोकळेपणाने संवाद साधला. तिला यावेळी विचारण्यात आलं की, तिने रोमॅंटिक पार्टनर निवडण्यासाठी कोणता पॅटर्न फॉलो केला होता? यावर ‘देसी गर्ल’ला तिच्या जुन्या रिलेशनशिप्सची आठवण आली आणि तिने सगळं सांगितलं.

पीसीने कुणावर ओवाळला होता जीव?

प्रियांकाने यावेळी सांगितलं की, ‘मी एका नात्यातून दुसऱ्या नात्यात शिफ्ट होत गेले. या नात्यांमध्ये मी स्वत:ला हरवत गेले होते. कारण मी स्वत:ला अजिबात वेळ दिला नाही. मी नेहमी त्या अभिनेत्यांना डेट केलं ज्यांच्यासोबत मी काम केलं. ज्या लोकांना मी सेटवर भेटले होते. त्यामुळे मला या गोष्टीचा जराही अंदाज नव्हता की, एखादं नातं कसं असायला हवं? मी नेहमी अशा नात्याच्या शोधात होते आणि त्या लोकांना आपल्या रिलेशनशिपच्या आयडियामध्ये फिट करण्याचा प्रयत्न करत राहिले. जे माझ्या आयुष्यात आले'.

'मी एक पायपुसनी बनून राहिले'

यादरम्यान प्रियांकाने कुणाचं नाव घेतलं नाही. ती म्हणाली की, 'मी सगळ्या गोष्टींसाठी स्वत:ला जबाबदार ठरवू लागले होते. मला असं वाटत होतं की, मला एक केअरटेकर बनण्याची गरज आहे. जसे की, माझं काम, माझ्या मीटिंग आणि माझ्या प्राथमिकतांमध्ये तेच सगळ्यात पुढे राहत होते. मी खरंच एक डोरमेट बनून राहिले होते आणि मी म्हणत होते की, हे ठीक आहे. 

ती पुढे म्हणाली की, महिलांना नेहमी हेच सांगण्यात आलं आहे की, आपली भूमिका परिवाराला एकत्र ठेवण्याची आहे आणि जेव्हा तुमचा पती घरी येईल तेव्हा त्याला कंफर्टेबल जाणवू द्या.

प्रियांकाने हे मान्य केलं की, तिचे सगळे रिलेशनशिप वाईट पद्धतीने संपले. पण तिने हेही सांगितलं की, तिने आधी ज्या सगळ्यांना डेट केलं ते सगळे चांगले होते. ती असंही म्हणाली की, निकसोबत रिलेशनशिपमध्ये येण्याआधी तिने यासाठी वेळ घेतला होता की, तिची आधीची नाती वाईट पद्धतीने का संपली. 

टॅग्स :प्रियंका चोप्राबॉलिवूड