Join us
Daily Top 2Weekly Top 5

दीपिका पादुकोणमुळे प्रियंका चोप्राच्या हातून निसटला 'रामलीला', तरी केलं आयटम साँग

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2025 16:17 IST

Ramleela Movie : २०१३ साली रिलीज झालेला संजय लीला भन्साळी यांचा 'गोलियों की रासलीला: रामलीला' सर्वाधिक चर्चेत असलेला चित्रपट होता. यामध्ये रणवीर सिंग आणि दीपिका पादुकोण मुख्य भूमिकेत होते.

२०१३ साली रिलीज झालेला संजय लीला भन्साळी (Sanjay Leela Bhansali) यांचा 'गोलियों की रासलीला: रामलीला' (Ramleela Movie) सर्वाधिक चर्चेत असलेला चित्रपट होता. यामध्ये रणवीर सिंग (Ranveer Singh) आणि दीपिका पादुकोण (Deepika Padukone) मुख्य भूमिकेत होते. प्रियंका चोप्राचं आयटम साँगही खूप गाजलं. तुम्हाला माहीत आहे का की दिग्दर्शकाने सुरुवातीला दोन इतर अभिनेत्रींना फिमेल लीडसाठी शॉर्टलिस्ट केले होते. करीना कपूरच्या नकारानंतर प्रियंका चोप्राने लीलाच्या भूमिकेसाठी होकार दिला. मात्र, नंतर शेवटच्या क्षणी दीपिकाने तिची जागा घेतली. त्यानंतर प्रियंकाने 'राम चाहे लीला' हे आयटम साँग केले.

प्रियंका चोप्राची आई मधु चोप्रा यांनी नुकतेच लेहरन रेट्रोला मुलाखत दिली. यावेळी त्यांनी खुलासा केला की, संजय लीला भन्साळींवर प्रियंका नाराज  नव्हती आणि रिप्लेस झाल्यानंतरही खूप खूश होती. मधु चोप्रा यांनी सांगितले की, मला याबद्दल जास्त काही आठवत नाही. मला फक्त इतकेच माहित आहे की मी माझ्या रूग्णांसह माझ्या क्लिनिकमध्ये असताना, ती शेजारच्या ऑफिसमध्ये गेली. जेव्हा ती परत आली तेव्हा तिने सांगितले की मी 'रामलीला'मध्ये फक्त एक गाणे करत आहे. मी तिला विचारलं, 'काय झालं?' 'मला वाटते ते अधिक चांगले आहे.

प्रियांकाने विचारपूर्वक निर्णय घेतला असेलमधु चोप्रा पुढे म्हणाल्या की, 'प्रियंकाने काळजीपूर्वक विचार करून निर्णय घेतला असण्याची शक्यता आहे. कदाचित त्यांच्यात काही चांगली चर्चा झाली असेल आणि तिने असे काहीतरी मान्य केले कारण ते अजूनही मित्र आहेत. जेव्हा होस्टने भन्साळी यांच्याबद्दल सांगितले की, प्रियांकाला मेरी कॉमचा विचार कर सांगण्यासाठी संकोच करत होते. कारण तिला 'रामलीला'मध्ये कास्ट न केल्याबद्दल ती अजूनही रागावली होती, यावर तिची आई म्हणाली, 'तिच्याकडे सूडाची वृत्ती नाही. संजय यांनी तिला तसे करण्यास सांगितले म्हणून तिने हा चित्रपट केला. ओमंग दिग्दर्शक होते आणि ती सर्वकाही पाहण्यासाठी काही काळ मेरी कोमसोबत राहिली होती.'

प्रियंकाने केलंय भन्साळींच्या 'बाजीराव मस्तानी'मध्ये कामभन्साळींच्या 'बाजीराव मस्तानी'मधील काशीबाईच्या व्यक्तिरेखेबद्दलही मधु चोप्रा यांनी सांगितले. त्या म्हणाल्या की, 'काशीबाई खूप कठीण होत्या कारण त्यात खूप घट्ट शॉट्स होते आणि ते सर्व चेहऱ्यावर होते. देहबोली सर्वस्व होती.

'भंसाली सोपे दिग्दर्शक नाहीत'संजय लीला भन्साळी यांच्यासोबत काम करणे सोपे नसल्याचे त्यांनी सांगितले. त्या म्हणाल्या की, 'भन्साळी हे सोपे दिग्दर्शक नाही आणि त्यांच्या कामगिरीवर समाधानी आहे या अर्थाने त्यांना खूश ठेवणं... हेच ध्येय होतं. ती यावर खूप लक्ष केंद्रित करायची. 

टॅग्स :प्रियंका चोप्रादीपिका पादुकोणसंजय लीला भन्साळी