Join us
Daily Top 2Weekly Top 5

बापरे...! प्रियंका चोप्रा इंस्टाग्रामवरील एका पोस्टमधून कमावते इतके रुपये, आकडा ऐकून व्हाल अचंबित

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2019 06:00 IST

प्रियंका चोप्रा फक्त देशभरातच नाही तर जगभरात प्रसिद्ध आहे. सोशल मीडियावरील सर्वात लोकप्रिय सेलेब्सच्या यादीत पिग्गी चॉप्सचा देखील समावेश आहे.

प्रियंका चोप्रा फक्त देशभरातच नाही तर जगभरात प्रसिद्ध आहे. सोशल मीडियावरील सर्वात लोकप्रिय सेलेब्सच्या यादीत पिग्गी चॉप्सचा देखील समावेश आहे. इंस्टाग्रामवरील तिचे पोस्ट व फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होता. मात्र प्रियंकासाठी सोशल मीडिया हे प्लॅटफॉर्म फक्त चाहते व फॉलोवर्सशी संवाद साधण्याचं माध्यम नाही. तर ती सोशल मीडियाच्या माध्यमातून कोटींची कमाई करते.

प्रियंकाने ब्रँडेड कंपन्यांसोबत करार करत असून, त्यांचे ब्रॅंड्स आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटंवरून प्रमोट करताना दिसते आहे. यातून तिला खूप पैसे मिळतात. त्याचबरोबर हॉपर एचक्यू (HopperHQ)ने प्रसिद्ध केलेल्या टूलमधील लिस्टनुसार तिला पोस्ट करण्याचेही कोट्यवधी रूपये मिळतात.

इंस्टाग्रामच्या शेड्युलिंग टूल HopperHQ ने एक यादी प्रसिद्ध केली आहे. त्यात प्रियंका एकटीच बॉलिवूड सेलिब्रिटी असून, ती १९व्या क्रमांकावर आहे. सेलिब्रिटी सब सेक्शनमध्ये ती १६व्या क्रमांकावर आहे. लिस्टनुसार तिचे ४ कोटी ३० लाखांहून अधिक फॉलोअर्स असून, तिला प्रत्येक पोस्टसाठी २ लाख ७१ हजार डॉलर म्हणजेच १ कोटी ८६ लाख ९८ हजार रूपये मिळतात. ही खरंच खूप मोठी रक्कम असून, ब्रँडेड कंपन्यांकडून झालेल्या करारातूनही ती आणखी पैसे मिळवते. ही रक्कम देखील कोट्यवधीमध्ये असते.

या यादीत प्रियंका व्यतिरिक्त टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहली देखील आहे. तो लिस्टमध्ये २३ व्या क्रमांकावर असून, स्पोर्ट्स सेक्शनमध्ये ९व्या क्रमांकावर आहे. त्याचे इंस्टाग्रामवर ३ कोटी ६१ लाख फॉलोअर्स असून त्याला एका पोस्ट साठी १ लाख ९६ हजार  डॉलर म्हणजेच एक कोटी ३५ लाख रूपये मिळतात. या लिस्टमध्ये अमेरिकेतील काइली कॉस्मेटिक्सची मालक काइली जेनर पहिल्या क्रमांकावर आहे.

प्रियंकाच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर ती स्काय इज पिंक चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करते आहे.

या चित्रपटाचं दिग्दर्शन शोनाली बोसने केलं असून यात प्रियंकासोबत झायरा वसीम व फरहान अख्तर मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

टॅग्स :प्रियंका चोप्राइन्स्टाग्राम