Join us

प्रियंका चोप्राच्या वाटेला आला आणखीन एक हॉलिवूडचा प्रोजेक्ट, झळकणार या सुपरहिट सीरिजमध्ये

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2020 17:43 IST

प्रियंका चोप्राला आणखीन एका हॉलिवूडचा प्रोजेक्ट मिळाल्याचं समजतं आहे.

'स्काई इज पिंक' चित्रपटानंतर बॉलिवूडची देसी गर्ल म्हणजेच प्रियंका चोप्रा हिने आगामी प्रोजेक्टचा खुलासा केला नव्हता. मात्र आता अशी माहिती मिळतेय की प्रियंका चोप्राला आणखीन एका हॉलिवूडचा प्रोजेक्ट मिळाला आहे.

अमर उजालाच्या रिपोर्ट्सनुसार, प्रियंका चोप्रा हॉलिवूडचा चित्रपट 'मॅट्रिक्स'च्या चौथ्या भागात दिसू शकते.गेल्या काही दिवसांपासून प्रियंका व निर्मात्यांमध्ये या संदर्भात बातचीत सुरू आहे. आता ही चर्चा शेवटच्या टप्प्यात आली आहे. जर सर्व काही ठीक असेल तर लवकरच देसी गर्ल या प्रोजेक्टची घोषणा करण्याची शक्यता आहे. 

मागील काही आठवड्यांपासून 'मॅट्रिक्स ४'मधील कलाकार ट्रेनिंग घेत आहे. असे वृत्त आहे की लवकरच नॉर्थ कॅलिफोर्नियामध्ये या चित्रपटाच्या शूटिंगला सुरूवात होणार आहे.

या चित्रपटात कियानू रिव्स, कॅरी ऐन मॉस, याह्या अब्दुल मतीन व नील पॅट्रीक हॅरिस यासारखे कलाकार मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या सीरिजचे दिग्दर्शन लाना वाचोवस्की करणार आहेत. तर वॉर्नर ब्रदर्स पिक्चर्स व विलेज रोड शो पिक्चर्स या चित्रपटाची निर्मिती करत आहेत. हा चौथा भागदेखील सायन्स फिक्शनवर आधारीत असणार आहे.

'मॅट्रिक्स'चा पहिला भाग १९९९ साली प्रदर्शित झाला होता. त्यानंतर दुसरा भाग 'द मॅट्रिक्स रिलोडेड' मे २००३ साली रिलीज झाला. तिसरा भाग 'द मॅट्रिक्स रिवॉल्युशन' नोव्हेंबर २००३ मध्ये प्रदर्शित झाला होता. आता चौथा भाग मे २०२१ मध्ये प्रदर्शित होण्याची शक्यता आहे.

टॅग्स :प्रियंका चोप्राहॉलिवूड