Join us

एकमेकांच्या प्रेमात होते प्रीती झिंटा आणि सलमान खान? अभिनेत्रीने केला खुलासा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2024 13:43 IST

प्रीतीने सलमान खानसोबतचे काही जुने फोटो सोशल मीडियावर शेअर केले.

Preity Zinta Salman Khan : बॉलिवूडची 'डिंपल गर्ल' प्रीती झिंटा आणि बॉलिवूडचा 'भाईजान' सलमान खान हे कायम चर्चेत असतात. दोघांचाही मोठा चाहतावर्ग आहे. सलमान आणि प्रीती हे एकमेकांचे खूप चांगले मित्र आहेत. दोघांनी अनेक सिनेमात एकत्र काम केलं आहे. पडद्यावरील दोघांच्या जोडीला प्रेक्षकांनी खूप पसंत केलं होतं. पण, खऱ्या आयुष्यात कधी सलमान आणि प्रीतीनं डेट केलं का, याचा खुलासा खुद्द अभिनेत्रीनं केला आहे. 

प्रीती झिंटानं सलमानच्या वाढदिवशी २७ डिसेंबरला शुभेच्छा देणारी खास पोस्ट शेअर केली. तिने सलमानसोबतचे काही फोटोही पोस्ट केले. कॅप्शनमध्ये तिनं लिहलं, "सलमान, तुला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा. माझं तुझ्यावर सर्वात जास्त प्रेम आहे. आता एवढंच सांगते, बाकी मी तुझ्याशी बोलल्यावर सांगेन... आणि हो आपले एकत्र अजून फोटो हवेत, नाहीतर तेच जुने पोस्ट करत राहीन!". तिच्या या पोस्टवर एका चाहत्यानं "तुम्ही दोघांनी डेट केलं आहेस का?" असा प्रश्न केला. यावर प्रीतीनं उत्तर देत लिहलं, "नाही, अजिबात नाही! तो कुटुंबातील सदस्य आहे आणि माझा सर्वात जवळचा मित्र आहे. तसेच तो पतीचा मित्रदेखील आहे".

सलमान आणि प्रीतीनं ९० च्या दशकात  'हर दिल जो प्यार करेगा', 'चोरी चोरी चुपके चुपके', 'दिल ने जिस अपना कहा', 'जान-ए-मन', 'हीरोज' असे अनेक हिट चित्रपट दिले. आता चाहत्यांना पुन्हा एकदा प्रीती आणि सलमान यांना एकत्र पडद्यावर पाहण्याची इच्छा आहे. प्रीतीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर ती लवकरच राजकुमार संतोषी दिग्दर्शित 'लाहोर 1947' या चित्रपटात दिसणार आहे. सिनेमाशिवायही प्रीती कायम चर्चेत असते. आयपीएल असो किंवा किंवा सोशल मीडिया तिची जादू सगळीकडे पाहायला मिळते.

टॅग्स :प्रीती झिंटासलमान खान