Join us
Daily Top 2Weekly Top 5

PICS : काकाच्या अंत्यदर्शनाला पोहोचलेल्या करिनाची अवस्था पाहून चाहत्यांनाही बसला धक्का

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2021 12:24 IST

काकाच्या निधनाची बातमी मिळताच प्रेग्नंट करिना कपूर तिची आई बबीता व बहीण करिश्मा कपूरसोबत त्यांच्या अंत्यदर्शनाला पोहोचली.

ठळक मुद्देगेल्या वर्षभरात कपूर कुटुंबावर हा तिसरा मोठा आघात आहे. ऋषी कपूर गेलेत. ऋषी कपूर यांच्या निधनाच्या दोन महिन्याआधीच त्यांची मोठी बहीण रितू नंदा यांचे निधन झाले होते.

दिवंगत अभिनेते ऋषि कपूर आणि रणधीर कपूर यांचे भाऊ राजीव कपूर यांचे काल मंगळवारी हृदविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या निधनामुळे अख्खे कपूर कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. अख्खे कपूर कुटुंब सध्या दु:खात आहे. एकमेकांना धीर देण्याचा प्रयत्न करतेय.बॉलिवूडमध्येही शोकाकुल वातावरण आहे. काल काकाच्या निधनाची बातमी मिळताच प्रेग्नंट करिना कपूर तिची आई बबीता व बहीण करिश्मा कपूरसोबत त्यांच्या अंत्यदर्शनाला पोहोचली.

यावेळी करिना कपूरची अवस्था बघून सगळ्यांनाच धक्का बसला. काकाच्या निधनाचे दु:ख तिच्या चेह-यावर स्पष्ट दिसले. तिच्या चेह-यावरचा ताणही स्पष्ट दिसला. येत्या काही दिवसात करिना तिच्या दुस-या अपत्याला जन्म देणार आहे. अशा अवस्थेत बेबोच्या चेह-यावरचा ताण बघून चाहत्यांनाही धक्का बसला. 

करिनाचे अनेक फोटो सध्या प्रचंड व्हायरल होत आहेत. हे फोटो पाहून चाहते तिला स्वत:ची काळीजी घेण्याचा सल्ला देत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार याच महिन्यातील पुढच्या आठवड्यात करिनाची डिलीवरी डेट आहे. अशात या दु:खातून लवकर बाहेर पडण्यासाठी चाहते प्रार्थना करत आहेत.  

गेल्या वर्षभरात कपूर कुटुंबावर हा तिसरा मोठा आघात आहे. ऋषी कपूर गेलेत. ऋषी कपूर यांच्या निधनाच्या दोन महिन्याआधीच त्यांची मोठी बहीण रितू नंदा यांचे निधन झाले होते. या दु:खातून कपूर कुटुंब सावरत असतानाच आज राजीव कपूर यांची प्राणज्योत मालवली.  गेल्यावर्षी  ऋषी कपूर यांचे कॅन्सरने निधन झाले होते. दोन वर्षापासून कॅन्सरशी झुंज सुरु असतानाच 30 एप्रिल 2020 रोजी ऋषी कपूर हे जग सोडून गेले होते. त्यांच्या निधनाने कपूर कुटुंबासह बॉलिवूड शोकसागरात बुडाले होते.  

ऋषी यांच्या निधनाच्या दोन महिन्यांआधी त्यांची मोठी बहीण रितू नंदा यांनी जगाचा निराप घेतला होता. त्यांनाही कॅन्सरने गाठले होते. 2018 साली मध्ये दिवंगत ज्येष्ठ अभिनेते राज कपूर यांच्या पत्नी कृष्णा कपूर  यांचे वृद्धापकाळाने निधन झाले होते. याच्या वर्षभराआधी म्हणजे 2017 मध्ये अभिनेते शशी कपूर यांनी जगाला अलविदा म्हटले होते.

टॅग्स :करिना कपूरराजीव कपूर