Join us
Daily Top 2Weekly Top 5

"घटस्फोटानंतर माझ्यातला राक्षस जागा झाला, सुंदर मुलींना...", प्रतीक बब्बरचा धक्कादायक खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2025 15:49 IST

माझ्यासाठी तो काळ मोठा मेंटल ब्लॉक होता... नक्की काय म्हणाला प्रतीक बब्बर?

राज बब्बर आणि स्मिता पाटील यांचा मुलगा अभिनेता प्रतीक बब्बर (Prateik Babbar) काही महिन्यांपूर्वीच लग्नबंधनात अडकला. गर्लफ्रेंड प्रिया बॅनर्जीसोबत त्याने लग्न केलं. मात्र हे त्याचं दुसरं लग्न आहे. याआधी त्याचा घटस्फोट झाला आहे. पहिल्या घटस्फोटानंतर प्रतीक नैराश्येत गेला होता. एका मुलाखतीत त्याने घटस्फोटानंतरचे दिवस कसे होते ते सांगितलं. त्याच्या मनात राक्षसी विचार यायचे असंही तो म्हणाला.

बॉलिवूड बबलला दिलेल्या मुलाखतीत प्रतीक बब्बर म्हणाला, "माझ्यासाठी तो काळ मोठा मेंटल ब्लॉक होता. घटस्फोटानंतर मला वाटलं की हे प्रेम आणि लग्न माझ्यासाठी बनलेलंच नाही. मी माझ्या पहिल्या लग्नात माझं सर्वस्व दिलं होतं. आयुष्याने आणि काही नात्यांनी माझ्यासोबत भले काहीही केलं असो मी माझं कर्तव्य नेहमी पार पाडलं. दुर्दैवाने आमचं लग्न टिकलं नाही. माझ्या मनात प्रेम आणि लग्नाबाबतीत कडवी भावना होती."

तो पुढे म्हणाला, "लग्न मोडल्यानंतर मी खूप डिस्टर्ब होतो. मी माझ्या या परिस्थितीवर खूप वैतागलो होतो आणि माझ्या मनात बदल्याची भावना होती. या भावनेतून मी इन्स्टाग्रामवर हजारो मुलींना फॉलो करायला लागलो. मला वाटायचं मी तर माझ्या संसारात खूप चांगला होतो तरी असं झालं...आता दाखवतोच. मी सुंदर मुलींच्या विरोधात गेलो. माझ्या मनातला राक्षसच जागा झाला होता."

प्रतीक आणि प्रियाची लॉकडाऊनवेळी एकमेकांशी ओळख झाली. तेव्हा प्रियाही कोणा पार्टनरच्या शोधात नव्हती आणि प्रतीकही नव्हता. प्रियाने तिचा साखरपुडा मोडला होता तर प्रतीक घटस्फोटित होता. अशा काळात दोघं एकमेकांना भेटले आणि काही महिन्यांनी प्रेमात पडले.

टॅग्स :प्रतीक बब्बरबॉलिवूडघटस्फोट