Join us
Daily Top 2Weekly Top 5

२१ दिवसांपासून उपोषणास बसलेल्या सोनम वांगचुक यांच्या भेटीला बॉलिवूड अभिनेता; म्हणतो, "लडाखमधील नागरिकांबरोबर..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2024 17:39 IST

६ मार्चपासून सोनम वांगचूक उपोषणास बसले आहेत. लडाखमधील क्लायमेट चेंजसाठी ते उपोषण करत आहेत. नुकतंच प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याने त्यांची भेट घेतली आहे. 

राजकुमार हिरानी यांच्या ३ इडियट्स सिनेमात आमिर खानने फुंसुक वांगडू ही भूमिका साकारली होती. खऱ्या आयुष्यातील सोनम वांगचुक यांच्यावर आधारित हे पात्र होतं. गेल्या काही दिवसांपासून सोनम वांगचुक चर्चेत आहेत. ६ मार्चपासून सोनम वांगचूक उपोषणास बसले आहेत. आज त्यांच्या उपोषणाचा २१वा दिवस आहे. लडाखमधील क्लायमेट चेंजसाठी ते उपोषण करत आहेत. नुकतंच प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेते प्रकाश राज यांनी त्यांची भेट घेतली आहे. 

प्रकाश राज यांचा आज वाढदिवस आहे. त्यांनी लडाखमध्ये उपोषणस्थळी सोनम वांगचुक यांची भेट घेत वाढदिवस साजरा केला. याबाबत त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत माहिती दिली आहे. प्रकाश राज यांनी सोनम वांगचुक यांच्याबरोबरचा उपोषण स्थळावरील फोटो शेअर केला आहे. "आज माझा वाढदिवस आहे...आपल्यासाठी, देशासाठी, वातावरणासाठी आणि आपल्या भविष्यासाठी लढणाऱ्या सोनम वांगचुक आणि लडाखमधील नागरिकांबरोबर मी हा वाढदिवस साजरा केला. त्यांच्याबरोबर उभं राहू या", असं त्यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे. प्रकाश राज अभिनयाबरोबरच त्यांच्या बिनधास्तपणासाठीही ओळखले जातात. समाजातील घडामोडी आणि राजकारणाबाबतही ते अनेकदा ट्वीटमधून त्यांचं मत मांडत असतात. 

दरम्यान, सोनम वांगचुक लडाखमध्ये गेल्या २१ दिवसांपासून जलवायु उपोषण करत आहेत. यादरम्यान केवळ पानी आणि मीठाचे सेवन ते करत आहेत. गेल्या काही दिवसांपासून लडाखमधील तापमान शून्य अंश सेल्सिअसच्या खाली आहे. अशा परिस्थितीतही ते मागे हटले नाहीत. त्यांच्याबरोबर लडाखमधील अन्य नागरिकही उपोषणास बसले आहेत. 

टॅग्स :प्रकाश राजसेलिब्रिटीलडाख