Join us
Daily Top 2Weekly Top 5

प्रभास आणि दीपिका पादुकोणच्या चित्रपटात दिसणार अमिताभ बच्चन, मानधनाचा आकडा वाचून व्हाल थक्क

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2020 19:00 IST

अमिताभ बच्चन यांच्या कामाबाबत सांगायचं तर ते अनेक प्रोजेक्ट्स करत आहेत.

'बाहुबली' स्टार प्रभास आणि दीपिका पादुकोण लवकरच सुप्रसिद्ध दिग्दर्शक नाग अश्विन यांच्या आगामी अ‍ॅक्शन फिल्ममध्ये दिसणार आहेत. नाग अश्विन यांच्या या सिनेमात प्रभास आणि दीपिका पादुकोण व्यतिरिक्त अमिताभ बच्चन यांचीदेखील एंट्री झाली आहे. या सिनेमाचे बजेट 100 कोटी असल्याचे बोलले जातेय.

अशी बातमी आहेत की नाग अश्विन यांच्या या सिनेमात काम करण्यासाठी अमिताभ बच्चन मोठी रक्कम घेणार आहेत. बॉलिवूड लाईफच्या रिपोर्टनुसार, प्रभास आणि दीपिका पादुकोणच्या  सिनेमाचा भाग होण्यासाठी अमिताभ बच्चन 21 कोटींचं मानधन घेणार आहेत. 

रिपोर्टनुसार, सिनेमाच्या निर्मात्यांना कोणत्याही परिस्थितीत बिग बींना या चित्रपटाचा एक भाग बनवायचे आहे. हिंदी चित्रपटसृष्टीत अमिताभ बच्चन हे नाव किती मोठं आहे याची चांगली कल्पना निर्मात्यांना आहे. यामुळेच निर्मात्यांनी अमिताभ बच्चन यांना 21 कोटींचं मानधन देण्याची तयारी दर्शविली आहे. २०२२ मध्ये हा सिनेमा वेगवेगळ्या भाषांमध्ये रिलीज होणार आहे.

दरम्यान, अमिताभ बच्चन यांच्या कामाबाबत सांगायचं तर ते अनेक प्रोजेक्ट्स करत आहेत. अमिताभ अयान मुखर्जीच्या सुपरनॅच्युरल थ्रीलर ब्रम्हास्त्रमध्येही दिसणार आहेत. यात त्यांच्यासोबत रणबीर कपूर, आलिया भट्ट आणि मौनी रॉय आहे. तसेच नागराज मंजुळेसोबतचा 'झुंड' हाही सिनेमा तयार आहे.

टॅग्स :अमिताभ बच्चनप्रभासदीपिका पादुकोण