Join us
Daily Top 2Weekly Top 5

सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री रीटा आंंचन यांचं दुःखद निधन, ७० च्या दशकातील बॉलिवूड सिनेमे गाजवले

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2024 13:45 IST

७० चा काळ गाजवणाऱ्या लोकप्रिय अभिनेत्री काळाच्या पडद्याआड. मान्यवरांनी व्यक्त केला शोक

बॉलिवूडमध्ये ७० चं दशक गाजवणारी लोकप्रिय अभिनेत्री रीटा आंचन यांचं निधन झाल्याची दुःखद बातमी समोर येतेय. रीटा आंचन यांच्या निधनाने मान्यवरांनी हळहळ व्यक्त केलीय. रीटा यांनी ७० च्या दशकात हिंदी शिवाय दाक्षिणात्य सिनेमांमध्येही अभिनय केलाय. कन्नड सिनेमांमध्ये अभिनय करुन त्यांनी लोकांचं प्रेम मिळवलं. १९७२ साली पुण्यातील FTII मध्ये रीटा यांनी शिक्षण घेतलं. रीटा यांचे सिनेमे आणि गाणीही लोकप्रिय झाली.

रीटा यांनी अनेक सिनेमांमध्ये केलं काम

'पारसंगदा गेंडे थिम्मा' या सिनेमात रीटा यांनी साकारलेली मारकानीची भूमिका प्रचंड गाजली होती. त्यांनी हिंदी, कन्नड सिनेमांसोबतच पंजाबी, गुजराती सिनेमांमध्येही अभिनय केला. गेल्या अनेक दिवसांपासून रीटा शारीरिक व्याधींनी ग्रस्त होत्त्या अन् त्यांच्यावर उपचार सुरु होते. रीटा यांच्या चाहत्यांनी आणि सिनेसृष्टीतील कलाकारांनी त्यांच्या दुःखद निधनाबद्दल हळहळ व्यक्त केली.

रीटा यांनी हे सिनेमे गाजवले

रीटा यांनी 'लड़की जवान हो गई', 'आप से प्यार हुआ', 'कोरा बदन', 'सुंदरभा', 'फर्ज' आणि प्यार या लोकप्रिय सिनेमांमध्ये काम केलं. 'पारसंगदा गेंडे थिम्मा' या सिनेमात त्यांनी साकारलेली मारकानीची भूमिका चांगलीच गाजली. त्यांनी पुढे राधाकृष्ण मंचिगैया यांच्यासोबत लग्न केलं. लग्नानंतर त्या बंगरुळुला स्थायिक झाल्या. त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे.

टॅग्स :बॉलिवूड