Join us

अवघ्या 12 दिवसात मोडला होता पूनम पांडेचा संसार; नवऱ्यावर केले होते गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2024 12:45 IST

Poonam pandey: लग्नानंतर १२ दिवसांमध्येच पूनमने तिच्या नवऱ्याला घटस्फोट दिला होता.

अभिनेत्री आणि सोशल मीडिया सेन्सेशन पूनम पांडे (poonam pandey) हिच्याविषयी धक्कादायक माहिती समोर आली आहे. वयाच्या ३२ व्या वर्षी पूनमचा कर्करोगामुळे मृत्यू झाला आहे. तिच्या अधिकृत इन्स्टाग्रामवर याविषयीची पोस्ट शेअर करण्यात आली असून या पोस्टनंतर सोशल मीडियावर एकच गोंधळ उडाला आहे. अनेकांना या घटनेमुळे धक्का बसला आहे. तर, तिच्या चाहत्यांमध्येही तिच्याविषयी वेगवेगळ्या चर्चा रंगू लागल्या आहेत. यामध्येच पूनमच्या वैवाहिक जीवनाची चर्चा रंगली आहे.

'न्यूज 18नुसार', पूनमचा काल (१ फेब्रुवारी) रात्री निधन झालं असून तिच्या मॅनेजरनेही या वृत्ताला दुजोरा दिला आहे. वयाच्या ३२ व्या वर्षी जगाचा निरोप घेणाऱ्या पूनमचं संपूर्ण आयुष्य वादग्रस्त राहिलं. आपल्या वादग्रस्त विधानांमुळे पूनम कायम चर्चेत राहिली. तर, लॉकअप सारख्या रिअॅलिटी शोमध्ये तिने तिची दुसरी बाजूही चाहत्यांसमोर उलगडली. या कार्यक्रमात तिने तिच्या वैवाहिक जीवनावर भाष्य केलं होतं. अवघ्या १२ दिवसात तिचा संसार मोडला होता.

केवळ १२ दिवस टिकला संसार

पूनमने २०२० मध्ये तिचा लाँग टाइम बॉयफ्रेंड सॅम बॉम्बे याच्यासोबत लग्नगाठ बांधली होती. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत तिने ही आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेअर सुद्धा केली होती. मात्र, लग्नानंतर अवघ्या काही दिवसात या जोडीचे खटके उडायला लागले. परिणामी, लग्नाच्या १२ दिवसानंतर त्यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला.  इतकंच नाही तर सॅम बॉम्बेसोबत घटस्फोट घेत पूनमने त्याच्यावर अनेक गंभीर आरोप केले होते. ज्यामुळे त्याला तुरुंगातही जावं लागलं होतं.

दरम्यान, पूनमने २०१३ मध्ये नशा या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. त्यानंतर ती काही मोजक्या सिनेमा आणि रिअॅलिटी शोमध्ये झळकली. 

टॅग्स :पूनम पांडेबॉलिवूडसेलिब्रिटी