Join us

पूनम पांडे महाकुंभात सहभागी होणार, त्रिवेणी संगमावर पवित्र स्नान करणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2025 16:59 IST

महाकुंभमेळ्यात स्नान करण्यासाठी देश-विदेशातील साधु, संत, महंत आणि भक्त येत आहेत.

Mahakumbh 2025: उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे जगातील सर्वात मोठ्या महाकुंभ मेळ्याची सुरुवात १३ जानेवारीला झाली. १२ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर हा कुंभमेळा सुरू झाला आहे. जगभरातले श्रद्धाळू महाकुंभमेळ्यात सहभागी होत आहेत. महाकुंभमेळ्यात शाही स्नान करण्यासाठी देश-विदेशातील साधु, संत, महंत आणि भक्त येतात. महाकुंभ मेळ्यात पवित्र अशा त्रिवेणी संगमावर स्नान करण्याला धार्मिक महत्त्व आहे. मान्यतेनुसार, महाकुंभ मेळ्यात स्नान केल्याने सर्व पापांपासून मुक्ती मिळते. तसेच, पुण्य फळ मिळतं. आता अभिनेत्री पूनम पांडेदेखील (Poonam Pandey) महाकुंभ मेळ्यात सहभागी होणार आहे. 

नुकतंच पूनम पांडे एअरपोर्टवर पापाराझींच्या कॅमेऱ्यात कैद झाली. यावेळी पापाराझींशी बोलताना तिनं आपण महाकुंभात स्नान करण्यासाठी जात असल्याचं सांगितलं. तसेच परत येताना सर्वांसाठी सर्वांना प्रसाद घेऊन येईल, असंही ती म्हणाली. पूनम पांडेचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.  काही नेटकऱ्यांची तिच्या या निर्णयाचं कौतुक केलं आहे. पण, काहींनी तिला ट्रोल केलं आहे. 

पूनम पांडे ही प्रसिद्ध मॉडेल आहे. गेल्या वर्षी तिनं २ फेब्रुवारी रोजी स्वत:च्याच मृत्यूची अफवा उडवली होती. सर्व्हायकल कॅन्सरमुळे पूनम पांडेचं निधन झालं अशी अफवा तिने आपल्या पीआर मार्फत पसरवली होती नंतर लाईव्ह येत तिने आपण हे जनजागृतीसाठी केल्याचं सांगितलं. यानंतर तिनं माफीही मागितली होती.  मात्र, नेटकऱ्यांनी तिच्यावर टीकेची झोड उठवली होती.

 याआधी २०११ मध्ये क्रिकेट वर्ल्ड कप फायनल मॅचच्या आधी पूनम सर्वाधिक चर्चेत आली होती. भारताने अंतिम सामना जिंकला तर मी स्ट्रिपिंग करेन, असं तिने जाहीर केलं होतं. तिच्या या व्हिडीओची त्यावेळी सर्वाधिक चर्चा झाली होती.पूनम कंगना रनौतच्या "लॉक अप' या रिॲलिटी शोमध्ये झळकली होती. तर रोहित शेट्टीच्या 'खतरों के खिलाडी ४' 'मध्येही ती सहभागी झाली होती. तिने २०१३ साली 'नशा' या सिनेमातून बॉलिवूड पदार्पण केलं होतं.  'आ गया हीरो', 'द जर्नी ऑफ कर्मा' यांसारख्या चित्रपटांमध्ये पूनम दिसली .

टॅग्स :पूनम पांडेकुंभ मेळासेलिब्रिटी