शाहिद कपूरचा (Shahid Kapoor) 'देवा' (Deva) हा अॅक्शनपट नुकताच रिलीज झाला आहे. शाहिदच्या अभिनयाची खूप स्तुती होत आहे. या सिनेमात त्याची जोडी अभिनेत्री पूजा हेगडेसोबत (Pooja Hegde) जमली आहे. पूजाने सिनेमात पत्रकाराची भूमिका साकारली आहे. त्यांचे काही रोमँटिक सीन्सही सिनेमात आहेत. दरम्यान सिनेमाच्या प्रमोशनवेळी माध्यमांशी संवाद साधत असताना पूजा हेगडेला राग अनावर झाला. तिला असा काय प्रश्न विचारण्यात आला ज्यामुळे ती भडकली वाचा.
पूजा हेगडे दाक्षिणात्य अभिनेत्री आहे. गेल्या काही वर्षात तिने काही हिंदी सिनेमेही केलेत. अनेक आघाडीच्या अभिनेत्यांसोबत तिला काम करण्याची संधी मिळाली. याचसंदर्भात एका पत्रकाराने पूजाला विचारलं, 'सिनेमात येताच तुला मोठमोळ्या अभिनेत्यांसोबत काम करायला मिळालं. हे तुझं नशीब होतं की तू खरंच यासाठी पात्र होतीस?' हा प्रश्न ऐकताच पूजा भडकली. पत्रकाराने अभिनेत्यांची नावंही घेतलं. सलमान खान, हृतिक रोशन, रणवीर सिंह, शाहिद कपूर अशा बड्या अभिनेत्यांसोबत तू काम केलं आहेस हे खरंच नशीब म्हणावं का? यानंतर पूजा सुरुवातीला वैतागते. नंतर उत्तर देत म्हणते, "मी यासाठी नक्कीच पात्र आहे. विशिष्य कारणामुळेच तर माझी निवड होत असेल ना."
तिला पुन्हा प्रश्न विचारण्यात आला की, बड्या अभिनेत्यांसोबत काम करायला खूप स्ट्रगल करावं लागतं. यावर ती म्हणाली, "मला वाटतं नशीब तेव्हाच असतं जेव्हा पूर्ण तयारीनंतर संधी मिळते. माझ्यासोबतही हेच झालं असावं. जर तुम्हाला याला नशीबच म्हणायचं असेल तर ठीक आहे." यानंतर पत्रकाराने विचारलं, 'तू सिनेमे कसे निवडतेस?' यावर पूजा चांगलीच संतापते आणि म्हणते, 'तुम्हाला माझ्याशी काय अडचण आहे?'
पूजा भडकताच बाजूला बसलेला शाहिद वातावरण हलकं करण्याचा प्रयत्न करतो. याआधी पूजाला अशआ प्रकारे संतुलन बिघडताना पाहिलं गेलेलं नव्हतं. पूजाने २०१६ साली हृतिक रोशनच्या 'मोहेंजोदरो' मधून हिंदीत पदार्पण केलं. नंतर तिला अक्षय कुमारसोबत 'हाऊसफुल ४',सलमान खानसोबत 'किसी का भाई किसी की जान', रणवीर सिंहसोबत 'सर्कस' या सिनेमांमध्ये काम करायला मिळालं.