Join us

 ‘पीएम नरेंद्र मोदी’ बनताच विवेक ओबेरॉय झाला ट्रोल! अशी उडवली टर!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2019 12:54 IST

‘पीएम नरेंद्र मोदी’नामक या चित्रपटात अभिनेता विवेक ओबेरॉय नरेंद्र मोदी यांची व्यक्तिरेखा पडद्यावर साकारणार आहे. काल या बायोपिकचे पहिले पोस्टर रिलीज झाले आणि सोशल मीडियावर भन्नाट प्रतिक्रिया उमटल्या.

ठळक मुद्देअद्याप या चित्रपटाचा टीजर व ट्रेलर रिलीज झालेला नाही. त्यामुळे लूक्सच्या बाबतीत विवेक ओबेरॉय प्रेक्षकांच्या कसोटीवर किती खरा उतरतो, ते पाहणे रोचक असणार आहे.

माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या आयुष्यावर बेतलेला ‘द अ‍ॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर’ हा चित्रपट येतोय. पाठोपाठ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आयुष्यावर आधारित चित्रपटाचीही घोषणा झालीय. ‘पीएम नरेंद्र मोदी’नामक या चित्रपटात अभिनेता विवेक ओबेरॉय नरेंद्र मोदी यांची व्यक्तिरेखा पडद्यावर साकारणार आहे. काल या बायोपिकचे पहिले पोस्टर रिलीज झाले आणि सोशल मीडियावर भन्नाट प्रतिक्रिया उमटल्या. होय, विवेक ओबेरॉयला मोदींच्या रूपात पाहून अनेकांनी त्याची खिल्ली उडवली.

तू ना पीएम नरेंद्र मोदी दिसतोय, ना विवेक ओबेरॉय, अशी प्रतिक्रिया एका युजरने दिली. काही युजर्सनी हे पोस्टर म्हणजे, निव्वळ फोटोशॉप असल्याचे म्हटले.  एक युजर तर थेट सल्ला देऊन मोकळा झाला. या चित्रपटासाठी विवेकऐवजी परेश रावल यांना कास्ट करायला हवे होते, असे या युजरने म्हटले.महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या चित्रपटाचे पोस्टर तब्बल २३ भाषांमध्ये लाँच केले आहे. उमंग कुमार या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत. तर संदीप सिंग चित्रपटाची निर्मिती करणार आहेत. जानेवारीच्या मध्यंतरी शूटींगला सुरुवात होईल. अर्थात या चित्रपटाची कथा मोदींच्या संघर्षावर आधारित असणार, की राजकीय परिस्थितीवर हे अद्याप गुलदस्त्यात आहे.अद्याप या चित्रपटाचा टीजर व ट्रेलर रिलीज झालेला नाही. त्यामुळे लूक्सच्या बाबतीत विवेक ओबेरॉय प्रेक्षकांच्या कसोटीवर किती खरा उतरतो, ते पाहणे रोचक असणार आहे. आधी या चित्रपटात परेश रावल यांना कास्ट करण्यात येणार असल्याची चर्चा होती. खुद्द परेश हेही या भूमिकेसाठी उत्सूक होते. नरेंद्र मोदींच्या भूमिकेला माझ्याशिवाय अन्य कुणीच न्याय देऊ शकत नाही, असे त्यांनी म्हटले होते. 

टॅग्स :विवेक ऑबेरॉयनरेंद्र मोदी