बॉलिवूडच्या चंदेरी दुनियेत असे काही कलाकार चमकून जातात ज्यांची सुरुवातीला फार चर्चा होते. मात्रा काळाच्या ओघात सिनेप्रेमीसुद्धा त्यांना विसरून जातात. २००५ साली प्रदर्शित झालेल्या ‘लकी नो टाइम फॉर लव्ह’ या सलमान खानच्या चित्रपटातील अभिनेत्री स्नेहा उल्लाल हिची कहाणीही काहीशी अशीच आहे. सलमान खानची माजी प्रेयसी असलेल्या ऐश्वर्या रॉयशी मिळताजुळता चेहरा असल्याने आणि वयाच्या १८ व्या वर्षीच सलमान खानसोबत काम कऱण्याची संधी मिळाल्याने स्नेहा उल्लाल हिची त्यावेळी खूप चर्चा झाली होती. मात्र बघता बघता ही अभिनेत्री काळाच्या ओघात हरवून गेली होती. त्यामुळे आता ती सध्या काय करतेय, कशी दिसते, असा प्रश्न चाहत्यांना पडतो.
१९८७ साली ओमानमधील मस्कत येथे जन्मलेल्या स्नेहा हिला २००५ साली सलमान खानच्या लकी नो टाइम फॉर लव्ह या चित्रपटात संधी मिळाली होती. बॉलिवूडमधील पदार्पणातच तिची खूप चर्चा झाली होती. काहीजण मात्र तिला केवळ ऐश्वर्या रॉयसारखी दिसणारी तिची डुप्लिकेट असं संबोधत असत. दरम्यान, लकी चित्रपटानंतर तिला फारशी संधी मिळाली नाही. दोन चार चित्रपटांनंतर ती गायबच झाली. २०१५ साली प्रदर्शित झालेल्या बेजुबां चित्रपटानंतर ती सिनेसृष्टीपासून पूर्णपणे दूर गेली.
दरम्यानचा काळात आपण एका गंभीर आजाराचा सामना केल्याचे तिने एका मुलाखतीत सांगितले. तसेच त्यामुळे चार वर्षे आपल्याला नीट चालताही येत नव्हते, अशी माहितीही तिने दिली होती. दरम्यान, या सर्वांवर मात करत स्नेहा उल्लालने २०२३ मध्ये लव्ह यू लोकतंत्र नावाच्या चित्रपटामधून पुनरागमन केलं होतं. दरम्यान, सध्या स्नेहा उल्लाल चित्रपटसृष्टीत तितकीशी सक्रिय नसली तरी सोशल मीडियावर बरीच अॅक्टिव्ह असते. तसेच इन्स्टाग्रामसह इतर सोशल मीडियावर आपले स्टायलिश फोटो शेअर करत असते.
स्नेहा हिने तिच्या सोशल मीडियावर हल्लीच काही फोटो शेअर केले आहेत. त्यामुळे ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.