Join us

राजकुमार रावने दिला सल्ला अन् पत्रलेखाने सोडला ‘पंगा’!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2018 14:01 IST

 अभिनेत्री पत्रलेखा हिने अश्विनी अय्यर तिवारीच्या ‘पंगा’ या चित्रपटासाठी अखेरच्या क्षणी नकार दिला, याचे सगळ्यांनाच आश्चर्य वाटले. हा चित्रपट पत्रलेखाने का नाकारावा, याची बरीच चर्चा झाली. 

 अभिनेत्री पत्रलेखा हिने अश्विनी अय्यर तिवारीच्या ‘पंगा’ या चित्रपटासाठी अखेरच्या क्षणी नकार दिला, याचे सगळ्यांनाच आश्चर्य वाटले. हा चित्रपट पत्रलेखाने का नाकारावा, याची बरीच चर्चा झाली. पण आता यामागचे कारण समोर आले आहे. होय, पत्रलेखाने हा चित्रपट करण्यास नकार दिला कारण राजकुमार राव. होय, राजकुमार राव व पत्रलेखा दोघेही दीर्घकाळापासून रिलेशनमध्ये आहेत. साहजिकचं, कुठलाही चित्रपट करायचा म्हटल्यावर राजकुमारचे मत पत्रलेखासाठी महत्त्वाचे असणारचं. ‘पंगा’ची स्क्रिप्ट पत्रलेखाला आवडली होती. तिने यासाठी होकारही दिला होता. पण शेवटच्या क्षणी राजकुमारने तिला सावध केले आणि पत्रलेखाने म्हणे यासाठी नकार दिला. 

होय, या चित्रपटात  कंगना राष्ट्रीय स्तरावरच्या महिला कबड्डीपटूची भूमिका साकारताना दिसणार आहे. कंगनासोबत राजकुमार रावने आधीही काम केले आहे. लवकरच कंगना व राजकुमार रावचा ‘मेंटल है क्या’ हा चित्रपटही रिलीज होत आहे. कंगना आपल्या चित्रपटात कुणालाच हावी होऊ देत नाही. चित्रपटाचा सर्व फोकस आपल्यावर राहावा, हा तिचा प्रयत्न असतो. अशास्थितीत तिच्या फिमेल को-स्टारकडे करण्यासारखे काहीही उरत नाही, असे राजकुमारने म्हणे पत्रलेखाला सांगितले. मग काय, राजकुमारचा (कदाचित अनुभवाचे बोल) हा सल्ला ऐकल्यानंतर पत्रलेखाने कंगनासोबत ‘पंगा’ न घेणेच योग्य समजले.पत्रलेखाने नकार दिल्यावर या चित्रपटात तिच्याजागी रिचा चड्ढाची वर्णी लागली.कंगनाशिवाय अभिनेत्री नीना गुप्ता आणि पंजाबी अभिनेता जस्सी गिल यात महत्त्वपूर्ण भूमिकेत आहे. अलीकडे अश्विनीने या चित्रपटाच्या स्टारकास्टची माहिती देणारा व्हिडिओ जारी केला होता. हा चित्रपट पुढील वर्षी रिलीज होणार आहे. आता त्यापूर्वी ‘पंगा’च्या सेटवर काय काय घडामोडी घडतात, ते पाहणे इंटरेस्टिंग असणार आहे.

टॅग्स :पत्रलेखाराजकुमार रावकंगना राणौत