अभिनेता राजकुमार राव आणि पत्रलेखा काही महिन्यांपूर्वीच आईबाबा झाले. पत्रलेखाने गोंडस मुलीला जन्म दिला. लेकीच्या जन्मानंतर पत्रलेखा पहिल्यांदाच दिसली. यावेळी तिने कोऑर्ड सेट घातला होता. मात्र तिचं वजन कमालीचं वाढलेलं दिसत होतं. यावरुन तिला नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर खूप ट्रोल केलं. पापाराझींनी मुद्दामून तिला कॅमेऱ्यात कैद करुन तिच्या वाढलेल्या वजनाबद्दल लिहिलं. आता पत्रलेखा पापाराझींवर आणि ट्रोलर्सवर संतापली असून तिने पोस्ट शेअर केली आहे.
पत्रलेखाने इन्स्टाग्राम स्टोरी शेअर करत लिहिले, "पॅप पेजेस, मला काय झालंय? मी नुकतंच बाळाला जन्म दिला आहे. हो माझं वजन वाढलंय..तुम्हाला सगळ्यांना कदाचित हे असामान्य वाटत असेल. पण मी नुसतं बसून भरपूर खाल्लंय असं नाहीये. मी बाळाला जन्म दिलाय आणि सोबतच दोन सिनेमांची निर्मिती केली आहे जे अजिबातच सोपं नाहीये."
ती पुढे लिहिते, "जर मला शक्य असतं तर मी अशी झाले नसते. पण प्रेग्नंसीनंतर माझ्या शरिराने अशा प्रकारे रिअॅक्ट केलं. अरे किमान देवासाठी तरी थोडे दयाळू व्हायला शिका."
राजकुमार राव आणि सान्या मल्होत्राचा 'टोस्टर' सिनेमा नुकताच रिलीज झाला आहे. या सिनेमात पत्रलेखाचाही कॅमिओ आहे. तो सीन सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. पत्रलेखा शेवटची 'फुले' सिनेमात दिसली. यात तिने सावित्रीबाई फुलेंची भूमिका साकारली होती. तिच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं.
राजकुमार आणि पत्रलेखा १५ नोव्हेंबर २०२१ रोजी लग्नबंधनात अडकले. लग्नानंतर चार वर्षांनी त्यांच्या घरी पाळणा हलला. दोघांनी लेकीचं नाव पार्वती पॉल राव असं ठेवलं आहे.
Web Summary : Patralekhaa faced online trolling for her post-pregnancy weight gain after giving birth. She responded strongly, stating she recently gave birth and is producing films, urging compassion.
Web Summary : पत्रलेखा को जन्म के बाद वजन बढ़ने के लिए ट्रोल किया गया। उन्होंने कहा कि उन्होंने हाल ही में एक बच्चे को जन्म दिया है और फिल्में बना रही हैं, दया दिखाने का आग्रह किया।