Join us

Pathan: तिसऱ्या दिवशी पठाण सुस्तावला, कमाईत मोठी घट, बाहुबली-२, दंगलचा रेकॉर्ड तोडण्यात अपयश

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2023 09:04 IST

Pathan: पहिल्या दोन दिवसांत शाहरुख खानच्या पठाण चित्रपटाने अनेक रेकॉर्ड तोडले होते. मात्र तिसऱ्या दिवशी पठाणच्या कमाईचा वेग कमालीचा सुस्तावला आहे. सुट्टीचा दिवस नसल्याने या सिनेमाला नुकसान सहन करावे लागले आहे.

वादविवाद आणि शाहरुख खानच्या दीर्घकाळानंतर झालेल्या पुनरागमनामुळे चर्चेत असलेल्या पठाण चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जोरदार सुरुवात केली होती. पहिल्या दोन दिवसांत या चित्रपटाने अनेक रेकॉर्ड तोडले होते. मात्र तिसऱ्या दिवशी पठाणच्या कमाईचा वेग कमालीचा सुस्तावला आहे. सुट्टीचा दिवस नसल्याने या सिनेमाला नुकसान सहन करावे लागले आहे. तिसऱ्या दिवशी पठाण कमाईचा २०० कोटी रुपयांचा आकडा पार करेल, अशी अपेक्षा करण्यात आली होती. मात्र तसं झालं नाही.

पठाणच्या तिसऱ्या दिवशीच्या कमाईचे आकडे समोर आले आहेत. ट्रेड अॅनालिस्ट रमेश बाला यांनी दिलेल्या माहितीनुसार या चित्रपटाने भारतामध्ये ३४ कोटी ते ३६ कोटी रुपयांची कमाई केली आहे. इतर चित्रपटांच्या तुलनेत हा आकडा खूप कमी आहे. तिसऱ्या दिवशीच्या कमाईसोबत पठाण बाहुबली २, केजीएफ २ आणि दंगलसारख्या चित्रपटांचं रेकॉर्ड तोडेल, अशी अपेक्षा होती. मात्र सध्या येत असलेल्या माहितीनुसार ते होऊ शकलेलं नाही. 

शुक्रवार २७ जानेवारी रोजी सुट्टी नव्हती. त्यामुळे बॉक्स ऑफिसवर पठाणचा वेग मंदावल्याचे सांगण्यात येत आहे. इतर चित्रपटांचा विचार केल्यास संजू ने तिसऱ्या दिवशी ४६.७१ कोटी रुपयांची कमाई केली होती. बाहुबली २ ने ४६.५ कोटी, केजीएफ २ ने ४२.९ कोटी टायगर जिंदा है ने ४५.५३ कोटी तर दंगलने ४१.३४ कोटी रुपयांची कमाई केली होती. मात्र या चित्रपटांच्या तिसऱ्या दिवशी सुट्टीचा दिवस होता.

पठाणने दुसऱ्या दिवशी बॉक्स ऑफिसवर ७० कोटी रुपयांची कमाई केली होती. आता पुढचे दोन दिवस सुट्टीचे असल्याने पठाण पुन्हा एकदा बॉक्स ऑफिसवर कमाल करेल, अशी शक्यता आहे.  

टॅग्स :पठाण सिनेमाशाहरुख खानबॉलिवूड