Join us

Pathaan Movie : जगातील सर्वात उंच थिएटरमध्ये पठाण प्रदर्शित, लद्दाखचे हे थिएटर आहे खूपच खास

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2023 18:14 IST

बॉलिवुड किंग शाहरुख खानच्या पठाणने पहिल्याच दिवशी थिएटर्समध्ये धुमाकूळ घातला आहे.

Pathaan Movie : बॉलिवुड किंग शाहरुख खानच्या पठाणने पहिल्याच दिवशी थिएटर्समध्ये धुमाकूळ घातला आहे. पठाणची क्रेझ पाहता चाहत्यांकडूनही सकारात्मक प्रतिक्रिया आल्या आहेत. रेकॉर्डतोड कामगिरी करण्यासाठी पठाण सज्ज झाला आहे.१०० पेक्षा जास्त देशात जगभरात ८ हजार स्क्रीन्सवर सिनेमा प्रदर्शित झाला आहे. दरम्यान भारतातील एका सर्वात उंच थिएटरमध्येही पठाण बघण्याचा आनंद लुटता आला आहे.

शाहरुखच्या पठाण ची क्रेझ एवढी आहे की लद्दाख मधील सर्वात उंच सिनेमागृहात पठाणचा शो दाखवला गेला. लेहच्या ट्रॅव्हलिंग सिनेमाघर पिक्चरटाईम डिजीप्लेक्समध्ये सिनेमा प्रदर्शित झाला. या सिनेमागृहाला जगातील सर्वात उंच मोबाईल थिएटर म्हणले जाते. हे सुमारे ११.५० फीट उंच आहे. भारतीय आणि आंतरराष्ट्रीय नवीन चित्रपटांचा आनंद घेण्यासाठी या थिएटरला बनवण्यात आले आहे जे जगात सर्वात उंच स्थित आहे.

पहिल्या दिवशी कमावणार इतके कोटी...जाणकारांच्या मते, ‘पठाण’ रिलीजच्या पहिल्या दिवशीच ३९ ते ४१ कोटींचा बिझनेस करू शकतो. अर्थात ‘पठाण’ने पहिल्या दिवशी ४० कोटी कमावले तरीही हा सिनेमा शाहरूखच्या हॅपी न्यू ईअर या बिग ओपनर सिनेमाचा मुकाबला करू शकणार नाहीये. हॅपी न्यू ईअर हा शाहरूखचा आत्तापर्यंतचा सर्वात मोठा ओपनर सिनेमा आहे. या सिनेमाने पहिल्या दिवशी ४४ कोटींची कमाई केली होती. 

टॅग्स :पठाण सिनेमाशाहरुख खानलडाखनाटक