Join us
Daily Top 2Weekly Top 5

म्हणून परिणीती चोप्राने सोशल मीडियावर अक्षय कुमार आणि करण जोहरचे मानले आभार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2018 11:45 IST

सध्या परी अक्षय कुमारसोबत राजस्थानमध्ये केसरी सिनेमाचे शूटिंग करतेय. केसरीमध्ये अक्षय कुमार हवालदार ईश्वर सिंगची भूमिका साकारत आहे. सारगढी युद्धाची कहाणी शीख इतिहासात मोठ्या गर्वाने सांगितली जाते.

ठळक मुद्देपरिणीतीची यातील भूमिका छोटीशी असल्याची माहिती आहे सिनेमाच्या सेटवरचा एक फोटो परीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे

लग्नाच्या चर्चेंमुळे परिणीती चोप्रा सध्या लाईम लाईटमध्ये आहे. प्रियांका चोप्राच्या लग्नानंतर परिणीती लग्न बंधनात अडकणार असल्याची जोरदार चर्चा होती. मात्र तिने या सगळ्या चर्चा फेटाळून लावल्या आहेत. सध्या परी अक्षय कुमारसोबत राजस्थानमध्ये केसरी सिनेमाचे शूटिंग करतेय. या सिनेमाच्या सेटवरचा एक फोटो परीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. या फोटाला परिणीतीने कॅप्शन देखील दिले आहे. या ऐतिहासिक सिनेमाचा मी एक भाग आहे याचा मला अभिमान आहे. अक्षय कुमार, करण जोहर आणि अनुराग कश्यपचे यांचे तिने सिनेमात तिला भूमिका दिल्याबद्दल आभार देखली मानले आहेत. 

परिणीतीची यातील भूमिका छोटीशी असल्याची माहिती आहे. पण सिनेमा ऐतिहासिक असल्यामुळे तिनं स्वीकारल्याचे खुलासा परिणीतीने केला आहे. बॉम्बे टाइम्सशी बोलताना ती म्हणाली होती, मला एखाद्या ऐतिहासिक सिनेमात मोठी भूमिका करायचीय. पण आता मी सुरुवात केसरीपासून करणार आहे.

केसरीमध्ये अक्षय कुमार हवालदार ईश्वर सिंगची भूमिका साकारत आहे. सारगढी युद्धाची कहाणी शीख इतिहासात मोठ्या गर्वाने सांगितली जाते. हे युद्ध १८९७ मध्ये झाले होते. ब्रिटिश इंडियन आर्मीसाठी ३६ शीख रेजिमेंटने या युद्धात आपल्या साहसाची ओळख करून दिली होती. आपल्या २१ सैनिकांना घेऊन इश्वर सिंगने १० हजार सैन्याला दोन वेळा पराभूत केले होते. दुर्दैवाने तिसऱ्या वेळेस त्याचा पराभव झाला पण पूर्ण ब्रिटिश आर्मी येईपर्यंत त्यांनी १० हजार सैन्याला थोपवून ठेवले होते. केसरी हा चित्रपट शूरवीर इश्वर सिंगची गोष्ट सांगणार आहे.

टॅग्स :परिणीती चोप्राअक्षय कुमार