बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि बॅडमिंटन चॅम्पियन सायना नेहवाल सध्या सोशल मीडियावरील 'अनफॉलो' ड्रामामुळे चर्चेत आहेत. परिणीती चोप्रानेसायना नेहवालला इन्स्टाग्रामवर अनफॉलो केल्याचे समोर आल्यानंतर लोकांच्या भुवया उंचावल्या होत्या. मात्र, आता स्वतः सायना नेहवालने यावर मौन सोडत धक्कादायक खुलासा केला आहे. विशेष म्हणजे परिणीतीने सायना नेहवालच्या बायोपिकमध्ये काम केलं होतं.
सायनाने एका पॉडकास्टमध्ये बोलताना स्पष्ट केले की, त्यांच्यात कधीच 'खूप जवळची मैत्री' नव्हती. सायना म्हणाली, "आमच्यात कधीही मैत्रीसारखे नाते निर्माण झालेच नाही. जेव्हा परिणीती माझ्या बायोपिकसाठी काम करत होती, तेव्हा आमचे बोलणे केवळ व्यावसायिक (Professional) स्वरूपाचे होते. तिने माझ्या आयुष्याबद्दल आणि संघर्षाबद्दल जाणून घेण्यासाठी माझी भेट घेतली होती, पण आमच्यात वैयक्तिक मैत्री झाली नाही."
सायनाचे मोठे वक्तव्यसोशल मीडियावरील या प्रकाराबद्दल सायनाला विचारले असता ती म्हणाली की, तिने कधी या गोष्टीकडे लक्षच दिले नाही की परिणीतीने तिला अनफॉलो केले आहे. "माझे आयुष्य ट्रेनिंग, टूर्नामेंट्स आणि इव्हेंट्समध्ये इतके व्यस्त आहे की, कोण मला फॉलो करतंय किंवा अनफॉलो करतंय, याकडे लक्ष द्यायला मला वेळच नाही," असे परखड मत तिने व्यक्त केले. तसेच, त्या दोघी कधीही एकत्र जेवायलाही कधी गेल्या नसल्याचेही तिने नमूद केले.
जरी परिणीतीने सायनाला अनफॉलो केले असले, तरी सायनाने त्यांच्यात कोणताही वाद किंवा भांडण झाल्याची शक्यता फेटाळून लावली आहे. २०२१ मध्ये आलेल्या 'सायना' या चित्रपटात परिणीतीने मुख्य भूमिका साकारली होती आणि तिच्या कामाचे कौतुकही झाले होते. अनफॉलो करण्यापलीकडे या दोघींमध्ये कोणताही वाद नाही, हे स्पष्ट झालं आहे.
Web Summary : Parineeti Chopra unfollowed Saina Nehwal, her biopic subject, sparking controversy. Nehwal clarified they were never close friends, their interaction was purely professional during the film's making. She downplayed the unfollowing, citing her busy schedule.
Web Summary : परिणीति चोपड़ा ने साइना नेहवाल को अनफॉलो किया, जिससे विवाद हुआ। साइना ने स्पष्ट किया कि वे कभी करीबी दोस्त नहीं थे, उनकी बातचीत फिल्म निर्माण के दौरान विशुद्ध रूप से पेशेवर थी। उन्होंने अनफॉलो करने को कम करके आंका, व्यस्त कार्यक्रम का हवाला दिया।