Join us

परिणीती चोप्रा आई होणार? राघव चढ्ढाने नकळत सांगून टाकलं, म्हणाला- "आम्ही लवकरच तुम्हाला.."

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2025 10:04 IST

परिणीती चोप्रा लवकरच आई होणार अशी चर्चा निर्माण झाली आहे. राघवने केलेल्या विधानामुळे या चर्चांना उधाण आलंय

परिणीती चोप्रा आणि राघव चढ्ढा हे दोघं नुकतेच ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’मध्ये पाहुणे म्हणून सहभागी झाले होते. या शोमध्ये दोघांमधील प्रेमकहाणी, लग्न आणि वैयक्तिक आयुष्यावर मजेशीर चर्चा झाली. त्यावेळी कपिल शर्माने या दोघांना अनेक विषयांवर बोलतं केलं. अशातच कपिल शर्माने राघव आणि परिणीतीला ते दोघं भविष्यात बेबी प्लॅनिंग करत आहेत का?, असा प्रश्न विचारला. त्यावेळी राघवने नकळत असं उत्तर दिलं की परिणीतीही काही क्षण अवाक झाली. जाणून घ्या काय घडलं?

परिणीती लवकरच आई होणार?

झालं असं की, परिणीती-राघवला कपिलने  प्रश्न विचारत विचारलं, “लग्न झालं, आता पुढचं पाऊल केव्हा?” या प्रश्नावर हे दोघे काय उत्तर देणार यावर सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. अशातच राघवने हसत उत्तर दिलं, “देईल, देईल... तुम्हा सर्वांना आम्ही लवकरच एक आनंदाची बातमी देऊ” त्याचं हे उत्तर ऐकून प्रेक्षकांमध्ये हशामस्करीचं वातावरण पसरलं, पण परिणीती थोडीशी गोंधळली आणि  तीआश्चर्याने राघवकडे पाहू लागली. तिच्या चेहऱ्यावरचे भाव क्षणभर गोंधळलेले होते, पण नंतर तिलाही हसू आलं.

या उत्तरामुळे प्रेक्षक आणि सोशल मीडियावरील चाहत्यांमध्ये चर्चा रंगली की, परिणीती आणि राघव लवकरच आई-बाबा होणार का? राघवने थेट उत्तर न देता थोडा मजेशीर आणि सूचक अंदाज दिल्यामुळे ही शक्यता आणखी वाढली आहे. या एपिसोडमध्ये कपिलने त्यांच्यातील केमिस्ट्रीवरूनही अनेक विनोदी प्रश्न विचारले. दोघांनीही हलक्याफुलक्या शैलीत उत्तर देत वातावरण मजेदार केलं. परिणीती आपल्याला शेवटी 'अमर सिंग चमकीला' या सिनेमात दिसली. या सिनेमातील परिणीतीच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं.

टॅग्स :परिणीती चोप्राबॉलिवूड